‘यूपीए’ सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा ऑलिम्पिक खेळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा ऑलिम्पिक खेळ खेळला गेला आणि सर्वात मोठा आयोजक काँग्रेस पक्ष होता, असा घणाघात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी काँग्रेसवर केला. स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनी काँग्रेसला समाप्त करायला हवे असे म्हटले होते. आता जनतेने ठरवले आहे की महात्मा गांधी जे म्हणाले होते ते पूर्ण …
‘यूपीए’ सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा ऑलिम्पिक खेळ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा ऑलिम्पिक खेळ खेळला गेला आणि सर्वात मोठा आयोजक काँग्रेस पक्ष होता, असा घणाघात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी काँग्रेसवर केला.
स्वातंत्र्याच्या वेळी महात्मा गांधींनी काँग्रेसला समाप्त करायला हवे असे म्हटले होते. आता जनतेने ठरवले आहे की महात्मा गांधी जे म्हणाले होते ते पूर्ण करायचे आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
मुलभूत अधिकारांवर निलंबनाची घटना काँग्रेसच्या काळात झाली. निवडून आलेल्या राज्य सरकारांना कोणी सर्वाधिक त्रास दिला असेल तर तो काँग्रेसचा आहे. आत्तापर्यंत देशात कलम ३५६ अंतर्गत १३२ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यापैकी काँग्रेसने ९० वेळा लागू केली आहे. इंदिरा गांधींनी सरकार पाडण्यासाठी अर्धशतक घालवले होते आणि ते आमच्यावर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत आहेत. मला काँग्रेसला विचारायचे आहे की, आमच्या सरकारने निवडून आलेले एक तरी राज्य सरकार पाडले आहे का? अशा एका सरकारचे नाव सांगा. यूपीए सरकारच्या काळात मात्र भ्रष्टाचाराचा ऑलिम्पिक खेळ सुरू होता, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली.
हेही वाचा : 

जीवनातील सुकरता ही मोदींची गॅरंटी
‘या’ १०१ कारणांसाठी माझे मत नरेंद्र मोदी यांना
निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची पक्षाला सोडचिट्ठी