काेल्‍हापूर: १८ वर्षांनंतर नियतीने डाव साधला : तरुणाचा अपघाती मृत्यू

गगनबावडा; पुढारी वृत्तसेवा : भीषण ट्रक अपघातातून बचावलेला चिमुरडा १८ वर्षांनंतर कारअपघातात ठार झाला. हा दुर्दैवी याेगायाेग कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर शनिवार, २७ एप्रिल राेजी घडला. देवेंद्र कांबळे असे अपघातात ठार झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. १८ वर्षापूर्वी अपघातात बचावल्यानंतर नियतीने डाव साधत देवेंद्रवर घाला घातला. त्‍याच्‍या अपघाती मृत्यूने गगनबावडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कारला …

काेल्‍हापूर: १८ वर्षांनंतर नियतीने डाव साधला : तरुणाचा अपघाती मृत्यू

गगनबावडा; Bharat Live News Media वृत्तसेवा : भीषण ट्रक अपघातातून बचावलेला चिमुरडा १८ वर्षांनंतर कारअपघातात ठार झाला. हा दुर्दैवी याेगायाेग कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर शनिवार, २७ एप्रिल राेजी घडला. देवेंद्र कांबळे असे अपघातात ठार झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. १८ वर्षापूर्वी अपघातात बचावल्यानंतर नियतीने डाव साधत देवेंद्रवर घाला घातला. त्‍याच्‍या अपघाती मृत्यूने गगनबावडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कारला अपघात
प्रथमेश रवींद्र माळी (वय २८, रा. गगनबावडा)  हा कार (एम.एच. ०२ सीडब्ल्यू ००५९)  कोरोची (ता. हातकणंगले) येथील लग्न समारंभ आटोपून देवेंद्र व त्याचा मित्र ओंकार पोतदार यांच्यासमवेत गगनबावड्याकडे परत येत होते. सांगशी येथील शाळेजवळ कार दगडावर धडकून पलटली. यावेळी कारचा मागील भाग झाडावर आदळला. मागील बाजूस बसलेल्या देवेंद्रला जबर दुखापत झाली. त्याचा जागीच मृत्यू झाला. ओंकार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कारचालक प्रथमेश याच्याविरोधात गगनबावडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
१८ वर्षांपूर्वी काय घडलं हाेतं?
अठरा वर्षापूर्वी देवेंद्र हा त्‍याचा चुलत भावाबरोबर गगनबावड्याहून वैभववाडीकडे ट्रकने जात हाेता. या वेळी  ट्रक करूळ घाटातील दरीत कोसळला. या भीषण अपघातात देवेंद्रचा चुलत भाऊ जागीच ठार झाला होता. अपघातापूर्वी चुलत भावाने पाच वर्षांच्या देवेंद्र दत्तात्रय कांबळे याला ट्रकमधून बाहेर फेकले. तो दरीतील झाडात अडकून बचावला होता. भीषण अपघातातून बचावलेला देवेंद्रवर १८ वर्षानंतर काळाने घाला घातला आणि कार अपघातात त्‍याचा मृत्‍यू झाला.
हेही वाचा : 

कोल्हापूर: कवठेगुलंद येथील स्वातंत्र्य सैनिक शामराव भगत यांचे निधन
कोल्हापूरवर टोल लादणार्‍यांना मत देणार की घालविणार्‍यांना? : फडणवीस
परप्रांतीयाचा डोक्यात रॉड घालून खून