महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी (Mahadev Betting App Case) अभिनेता आणि उद्योजक साहिल खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर येथे पकडल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुंबईत आणले जात आहे. साहिल खान ‘द लायन बुक ॲप’ नावाच्या सट्टेबाजी ॲपशी जोडलेला आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचाही भाग आहे. आज …

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी (Mahadev Betting App Case) अभिनेता आणि उद्योजक साहिल खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर येथे पकडल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याला मुंबईत आणले जात आहे.
साहिल खान ‘द लायन बुक ॲप’ नावाच्या सट्टेबाजी ॲपशी जोडलेला आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचाही भाग आहे. आज त्याला छत्तीसगडमधील जगदलपूर येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन आणि अटकेतून दिलासा न मिळाल्याने तो मुंबईतून पळून गेला होता. तब्बल ४० तास पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. तो वारंवार त्याचे लोकेशन बदलत होता. याआधी गुरुवारीही महादेव बेटिंग ॲप प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याची चार तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. (Mahadev Betting App Case)
हेही वाचा : 

‘या’ १०१ कारणांसाठी माझे मत नरेंद्र मोदी यांना
इथेनॉल बंदीच्या निर्णयामुळे ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक धोक्यात; जयराम रमेश यांची माहिती
निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची पक्षाला सोडचिट्ठी