दिवाळीच्या दिवशी नागपुरात १७ ठिकाणी आग

दिवाळीच्या दिवशी नागपुरात १७ ठिकाणी आग

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या दिवशी रविवारी (दि.१२) नागपूर शहरातील १७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या अग्निशमन केंद्रांवरील पथकांनी तत्परतेने बचावकार्य केल्याने अनर्थ टळला. या सर्व आगीच्या घटना रात्रीच्या सुमारास घडल्या आहेत.
कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रांतर्गत गणेशपेठ साखरे गुरूजी शाळेजवळील घराला आग लागली. अंदाजे १ लाखाचे नुकसान झाले तर पथकाच्या तत्परतेमुळे सुमारे १० लाखांचे नुकसान होण्यापासून वाचविण्यात यश आले. सोनेगाव येथील ममता हाऊसिंग सोसायटीमध्ये कचऱ्याला लागलेली आग विझवून त्रिमूर्तीनगर पथकाने २५ हजारांचे नुकसान होण्यापासून वाचविले. लकडगंज अग्निशमन केंद्रांतर्गत जुना बस स्टँड लकडगंज चौकी नं १० च्या समोर अनाज बाजार इतवारी येथे घराला आग लागली. पथकाने आग विझवून सुमारे ५० लाखांचे नुकसान होण्यापासून वाचविले. या घटनेत २५ हजारांचे नुकसान झाले.
यासह झेंडा चौक केंद्रीय वि‌द्यालय शाळेमध्ये अज्ञात कारणाने आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ लकडगंज अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी पोहोचले. पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले तर पथकाच्या तत्परतेने सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान होण्यापासून वाचविता आले. नंदनवन हसनबाग येथील जवाहर विद्यालय गॅरेजमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच सक्करदरा पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक पथकाने आग विझवून सुमारे २० लाखांचे नुकसान होण्यापासून वाचविले. या घटनेत अंदाजे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले.
लकडगंज स्थानक पथकाने कच्छीविसा भवन इमारतीमध्ये लागलेली आग विझवून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान होण्यापासून बचाव केला. या घटनेत अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. दक्षिणामूर्ती चौक येथे एका घरामध्ये लागलेली आग विझवून गंजीपेठ स्थानकाच्या पथकाने सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान होण्यापासून बचाव केला.  शिवाजी नगर गांधी नगर स्कूल जवळ एनआयटी कॉम्प्लेक्सच्या पाचव्या माळ्यावर आग लागल्याची घटना घडली. त्रिमूर्ती नगर स्थानक पथकाने संपूर्ण इमारतीला आगीमुळे निर्माण होणारा धोका टाळण्याच्या दृष्टीने बचाव कार्य केले. या घटनेत मोठी हानी टाळता आली. या आगीमध्ये अंदाजे २५ हजारांचे नुकसान झाले.
सक्करदरा अग्निशमन केंद्रांतर्गत हनुमान नगर चौकोनी उद्यान परिसरात एका घराला आग लागली. अग्निशमन पथकाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. भोले पेट्रोल पम्प म्हाडा कॉम्प्लेक्स जवळ, वैशाली नगर मैदानाजवळ, पिवळी नदी परिसरामध्ये, हरी नगर मानेवाडा चौक, फुटाळा तलाव वायूसेना नगर, नारायणपुरी सेंट्रल जेल समोरील रुम, सुभाष नगर शितला माता मंदिरच्या बाजुला, शंकर नगर दांडी गेट लेआऊट अॅल शोरुम घरावरील झाड विविध ठिकाणी लागलेली आग स्थानिक अग्निशमन केंद्रांच्या पथकांनी सतर्कता दाखवून विझवली. मनपाच्या अग्निशमन जवानांच्या कार्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी कौतुक करीत पथकाचे अभिनंदन केले. मुख्य अग्निशमन अधिकारी श्री.बी.पी. चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या अग्निशमन केंद्रावरील स्थानक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे बचावकार्य पार पाडण्यात आले.
The post दिवाळीच्या दिवशी नागपुरात १७ ठिकाणी आग appeared first on पुढारी.

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या दिवशी रविवारी (दि.१२) नागपूर शहरातील १७ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या अग्निशमन केंद्रांवरील पथकांनी तत्परतेने बचावकार्य केल्याने अनर्थ टळला. या सर्व आगीच्या घटना रात्रीच्या सुमारास घडल्या आहेत. कॉटन मार्केट अग्निशमन केंद्रांतर्गत गणेशपेठ साखरे गुरूजी शाळेजवळील घराला आग लागली. अंदाजे १ लाखाचे नुकसान झाले तर पथकाच्या तत्परतेमुळे सुमारे १० लाखांचे …

The post दिवाळीच्या दिवशी नागपुरात १७ ठिकाणी आग appeared first on पुढारी.

Go to Source