
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Delhi Congress)
दिल्लीत अद्याप लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडलेली नाही, त्यामुळे मतदानापूर्वी लवली यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणे हे पक्षाच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे.
दिल्ली काँग्रेस युनिट ही आम आदमी पक्षाशी युती करण्याच्या विरोधात होती. जी काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि चुकीचे भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याच्या एकमेव आधारावर स्थापन करण्यात आली होती. असे असूनही, पक्षाने दिल्लीत ‘आप’शी युती करण्याचा निर्णय घेतला…’, असे अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे.
Delhi Congress Chief Arvinder Singh Lovely resigns from his post. pic.twitter.com/um10eIqGsU
— ANI (@ANI) April 28, 2024
अरविंदर सिंग लवली यांच्याविषयी…
अरविंदर सिंग लवली हे भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. ते दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. 1998 मध्ये, ते गांधी नगर मतदारसंघातून सर्वात तरुण आमदार म्हणून दिल्ली विधानसभेवर निवडून आले. 2003, 2008 आणि 2013 मध्ये ते पुन्हा निवडून आले.
