रत्नागिरी : डोक्यात लाकडी दांडा घालून वृद्धाचा खून

रत्नागिरी; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील पोलीस मुख्यालया नजीकच्या कंपाऊंडमध्ये वृद्धाचा डोक्यात लाकडी दांडा घालून खून करण्यात आला. ही घटना आज (दि.27) उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून गवळीवाडा कडे जाणाऱ्या रोड लगत असणाऱ्या जुन्या रेगे कंपाऊंडमध्ये एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. अशोक वाडेकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना नेमकी कधी घडली. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत व्यक्ती ही कंपाउंड समोरील इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करत होती. या इमारतीनजीकच ते वास्तव्याला होते. त्यांचा खून नेमका कोणी व कोणत्या कारणातून झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
