रोहित आठवर बाद आणि ट्रेन्डमध्ये आला ‘वडापाव’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्याविरूद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मा अपयशी ठरला. आपल्या़ डावात तो अवघ्या आठ धावा करून तंबूत परतला. त्याला दिल्लीचा गोलंदाज खलील अहमदने होपकरवी झेलबाद केले. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करतान रोहित लवकर बाद झाला. यामुळे रोहितला सोशल मीडियावर जोरात ट्रोल केले जात आहे. सध्या रोहित शर्माला वडापाव म्हणून ट्रोल …
रोहित आठवर बाद आणि ट्रेन्डमध्ये आला ‘वडापाव’!

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्याविरूद्धच्या सामन्यात फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मा अपयशी ठरला. आपल्या़ डावात तो अवघ्या आठ धावा करून तंबूत परतला. त्याला दिल्लीचा गोलंदाज खलील अहमदने होपकरवी झेलबाद केले. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करतान रोहित लवकर बाद झाला. यामुळे रोहितला सोशल मीडियावर जोरात ट्रोल केले जात आहे. सध्या रोहित शर्माला वडापाव म्हणून ट्रोल केले जात आहे.
वडा पाव म्हणून का ट्रोल होतोय रोहित शर्मा
रोहित त्याच्या फिटनेस आणि खेळीबाबत अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होत असतो. सोशल मीडियावर रोहितला वडा पाव या नावाने ट्रोल करण्यात येतं. लोकांचा समज असा आहे की, रोहित मुंबईचा आहे म्हणून त्याला वडा पाव नावाने ट्रोल केलं जात.
आयपीएल 2024 मधील मुंबईची खेळी
यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार राहिली आहे. लीगचे पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबईने यंदाच्या हंगामात एकूण 9 सामने खेळले आहेत. यात मुंबईला फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला. तर उर्वरित 6 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या सुमार कामगिरीमुळे लीगच्या गुणतालिकेत मुंबई सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
रोहितची यंदाच्या हंगामातील कामगिरी
मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्वाच्या जोरावर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवणाऱ्या रोहितसाठी यंदाचा हंगाम खास नाही. स्पर्धेच्या सुरूवातीलाच रोहितला संघाच्या कर्णधार पदावरून हटवून हार्दिककडे संघाची कमान सोपवली. या निर्णयाविरूद्ध मुंबई आणि रोहितचे चाहते चांगलेच आक्रमक झाले होते. अशा परिस्थितीत ही रोहितने चांगली फलंदाजी करत आपला फॉर्म कायम ठेवला. काही सामन्यांचा अपवाद वगळता रोहितने आयपीएलच्या 17 व्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे.
यंदाच्या हंगामात रोहितने मुंबईसाठी 9 सामन्यात 311 धावांची खेळी केलीआहे. यामध्ये त्याने चेन्नईविरूद्धच्या सामन्यात नाबाद 105 धावांची शतकी खेळी करून मुंबईला विजयी करण्याचे प्रयत्न केले होते.

How to cook Maggie-
*Boil one cup of water
*As soon as Vadapav goes for batting , put Maggie in the boiled water and add masala
*Stir till Vadapav is On field
*As soon as Vadapav Rohit is back in the pavilion, your Maggie is ready to eatpic.twitter.com/pksyvhs4iL
— Dr. விடாமுயற்சி Salvatore (@KohliThala) April 27, 2024

Dhobi and Vadapav are trending together 😹
Never mess with Kohli FC 🔥🔥pic.twitter.com/2LKbMMCm5R
— Priyanshu (@PriyanshuVK18K) April 27, 2024

Vadapav 8(8) in 260 chase 😭 pic.twitter.com/3uOnE3BdAj
— Bish (@Duk3Nukem_) April 27, 2024

हेही वाचा : 

Sangli Lok Sabha : विशाल पाटलांना उमेदवारी मिळू न देण्यामागे जयंत पाटीलच खलनायक: विलासराव जगतापांचा घणाघात 
Nashik News: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले
Shruti Haasan Breakup : कोण आहे शांतून हजारिका? श्रुती हासनने ४ वर्षांच्या डेटनंतर संपवलं नातं