नागपूर: इतवारी सराफ मार्केटमधील ज्वेलर्सच्या दुकानाला भीषण आग

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : इतवारी सराफ मार्केट या वर्दळीच्या बाजारपेठेत आज दुपारी एका ज्वेलर्सच्या दुकानाला आग लागल्याने मोठी हानी झाली. इतवारीत गांधी पुतळा ते इतवारी दरम्यान श्री साईबाबा बेकरी परिसरात असलेल्या व्ही के ज्वेलर्स या दुकानात ही आग लागली.
धूर निघत असल्याने सचिन नावाच्या एका नागरिकाने अग्निशमन विभागाला कळवले. तातडीने लकडगंज, कॉटन मार्केट आणि गंजी पेठ फायर स्टेशन येथून तीन अग्निशमन वाहनासह अग्निशमन जवान घटनास्थळी रवाना झाले. आगीचे कारण अज्ञात असले तरी शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचे बोलले जाते. या आगीत दागदागिने व मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती असून काही वेळातच अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली. व्यापारी, रहिवासी असा हा दाट वस्तीचा परिसर असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
हेही वाचा
नागपूर, रामटेकचा निकाल 17 फेऱ्यांमधून; मतटक्का कमी पण, नवीन मतदार 24 हजारनी वाढले !
नागपूर: खरीप हंगामात वाढणार कापूस, सोयाबीन, धान पीक
नागपूर : आजच्या मतदानातून देशात एक क्रांती घडेल : आमदार बच्चू कडू
