कोल्हापूर: पट्टणकोडोलीत परप्रांतीय कामगाराचा खून

हुपरी: पुढारी वृत्तसेवा : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे २० वर्षीय परप्रांतीय कामगाराचा त्याच्याच मित्राने डोक्यात लोखंडी टॉमीचा प्रहार करुन खून केला. ही घटना आज (दि.२७) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुलेमान मुंतसरीब (रा. फारिंदा, पुलंदपूर, महाराजगंज, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र अंकितकुमार शिवप्रसाद (रा. कोनिया, जि. महू, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी …

कोल्हापूर: पट्टणकोडोलीत परप्रांतीय कामगाराचा खून

हुपरी: Bharat Live News Media वृत्तसेवा : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे २० वर्षीय परप्रांतीय कामगाराचा त्याच्याच मित्राने डोक्यात लोखंडी टॉमीचा प्रहार करुन खून केला. ही घटना आज (दि.२७) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुलेमान मुंतसरीब (रा. फारिंदा, पुलंदपूर, महाराजगंज, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र अंकितकुमार शिवप्रसाद (रा. कोनिया, जि. महू, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली आहे.
पट्टणकोडॊली येथील शीतपेय बनवणाऱ्या दुकानात हे दोघे कामाला होते.  या दोघांत वाद होता. आज सकाळी दुकान मालकाने गोडाऊन उघडल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली. पोलिसांनी तत्काळ तपास करुन संशयित आरोपीला जेरबंद केले आहे.
हेही वाचा 

कोल्हापूर: कवठेगुलंद येथील स्वातंत्र्य सैनिक शामराव भगत यांचे निधन
कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या उद्याच्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त
कोल्हापूर : गडहिंग्लजला उद्यापासून हेल्मेट सक्ती