कोण आहे शांतून हजारिका? श्रुती हासनने ४ वर्षांच्या डेटनंतर संपवलं नातं

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री श्रुती हासनने तब्बल ४ वर्षांच्या डेटिंगनंतर शांतून हजारिकासोबत ब्रेकअप केला आहे. तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका आणि ती ग्लॅमर वर्ल्डच्या सर्वात चर्चित कपल्सपैकी एक होते. सोशल मीडिया असो वा पब्लिकली बोलणे, ते खुल्यापणाने आपल्या भावना व्यक्त करायचे. चार वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर श्रुती आणि शांतनूने आपले मार्ग वेगळे केले. तिची लव्ह …

कोण आहे शांतून हजारिका? श्रुती हासनने ४ वर्षांच्या डेटनंतर संपवलं नातं

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री श्रुती हासनने तब्बल ४ वर्षांच्या डेटिंगनंतर शांतून हजारिकासोबत ब्रेकअप केला आहे. तिचा बॉयफ्रेंड शांतनू हजारिका आणि ती ग्लॅमर वर्ल्डच्या सर्वात चर्चित कपल्सपैकी एक होते. सोशल मीडिया असो वा पब्लिकली बोलणे, ते खुल्यापणाने आपल्या भावना व्यक्त करायचे. चार वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर श्रुती आणि शांतनूने आपले मार्ग वेगळे केले. तिची लव्ह स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.
श्रुती हासनने आपले खासगी जीवन नेहमीच सार्वजनिक केले आहे. शांतनू हजारिकाला जेव्हा डेट करणे सुरु केलं तेव्हा तिने ही गोष्ट उघडपणे सांगितली होती. सोशल मीडियावर रोमँटिक फोटोज शेअर करण्यापासून ते मुलाखतीत भरभरून कौतुक करण्यापर्यंत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी खुल्या केल्या होत्या. आता तिचे ब्रेकअप झाल्याने त्च्या चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचेही दिसते. तिच्या इन्स्टाग्राम पेजवर पाहता तिने शांतनूशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्याचे दिसते. पण. शांतूनच्या पेजवर तिचे काही फोटो असल्याचे आढळते.
कोविड काळात तिने शांतनूला डेटिंग करणे सुरु केले होते. श्रुती आणि शांतनूने एकमेकांना जवळपास ४ वर्षे डेट केलं. तिचं प्रेम सोशल मीडियावरून सुरु झालं. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, तिला शांतनूची पेंटिंग खूप आवडली होती. श्रुतीचे म्हमणे होते की, त्यावेळी तिला शांतनूबद्दल फार माहिती नव्हती.
शांतनु हजारिका एक डूडल आर्टिस्ट आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १ लाख २४ हजार फॉलोअर्स आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Santanu Hazarika (@santanu_hazarika_art)

 

View this post on Instagram

 
A post shared by ✨Prakruthi Ananth 💄🎨✨ (@prakatwork)