Aranmanai 4 मधील गाण्यासाठी राशी खन्नाने वेट ट्रेनिंगपासून ते डाएटपर्यंत अशी घेतली मेहनत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अष्टपैलू अभिनेत्री राशी खन्ना हिने तिच्या आगामी तमिळ चित्रपट ‘अरनमनाई 4’ मधील ‘अचाचो’ गाण्यात तिच्या लूकसह सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (Rashi Khanna) तुम्हाला माहितीये का, “योद्धा” फेम अभिनेत्री राशी खन्नाने या गाण्यासाठी खास मेहनत देखील घेतली आहे. टोन्ड बॉडी करण्यासाठी राशीने खास डाएट देखील फॉलो केल्याचं कळतंय. (Rashi Khanna ) …

Aranmanai 4 मधील गाण्यासाठी राशी खन्नाने वेट ट्रेनिंगपासून ते डाएटपर्यंत अशी घेतली मेहनत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अष्टपैलू अभिनेत्री राशी खन्ना हिने तिच्या आगामी तमिळ चित्रपट ‘अरनमनाई 4’ मधील ‘अचाचो’ गाण्यात तिच्या लूकसह सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. (Rashi Khanna) तुम्हाला माहितीये का, “योद्धा” फेम अभिनेत्री राशी खन्नाने या गाण्यासाठी खास मेहनत देखील घेतली आहे. टोन्ड बॉडी करण्यासाठी राशीने खास डाएट देखील फॉलो केल्याचं कळतंय. (Rashi Khanna )
फिटनेसचा कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो यावर जोर देऊन राशी म्हणाली, “मी या गाण्यासाठी खास कष्ट घेतले आहेत. १२ ते १६ तासांच्या शूटिंगच्या दिवसातही मी माझ्या वर्कआउटसाठी वेळ काढते. रोज नियमित व्यायाम करून डाएट पाळून मी या गाण्यासाठी तयार झाली आहे. अगदी रविवारच्या चीट डेसाठी सुद्धा निरोगी आहार ठेवून मी या गाण्यासाठी टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी मेहनत घेतली आहे.”

याआधी ‘मद्रास कॅफे’ आणि ” योद्धा ” सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवणारी ही अभिनेत्री हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ मध्ये कमालीची भूमिका साकारणार आहे.
राशी आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये ती विक्रांत मेसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. दोन्ही कलाकार पत्रकारांच्या भूमिकेत दिसणारा हा चित्रपट २ ऑगस्ट, २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. राशी हा हिंदी चित्रपट ‘TME’ आणि तेलुगु चित्रपट ‘तेलुसू काडा’ प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.