नागपुरातील हवा बिघडली; महाल परिसरात सर्वाधिक प्रदुषण

नागपुरातील हवा बिघडली; महाल परिसरात सर्वाधिक प्रदुषण

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे नागपुरात प्रदूषण वाढले आहे. याचा
परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. सर्वाधिक प्रदुषण रविवारी वर्दळ, गजबजलेल्या आणि संघ मुख्यालय असलेल्या महाल परिसरात झाले असल्याची नोंद झाली आहे. महाल परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १२५६ पेक्षाही जास्त आढळून आला आहे. ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
नागपूर परिसरातील प्रदुषित ठिकाणे
उपराजधानी नागपुरात महाल परिसरात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक एक्यूआय – १२५६ ते १५३५, रामनगर परिसरात ५६६ – ११०९  अंबाझरी परिसरात- ३०२ -६४५ ,  सिव्हिल लाईन्स परिसरात ३०० च्या आसपास आढळून आला. याचाच अर्थ नागपुरात महाल परिसरात फटाक्यांमध्ये झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण शहरात सर्वाधिक होते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ९ वाजता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या प्रदूषणाच्या आढाव्यात महाराष्ट्रात सर्वाधिक हवा उपवन ठाणे येथे आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३६३० इतका जास्त आढळून आला. आरोग्याच्या दृष्टीने ही हवेच्या गुणवत्तेची अत्यंत धोकादायक पातळी मानली जाते. साधारणतः हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०० पेक्षा अधिक राहिल्यास आरोग्याच्या दृष्टीने ती अत्यंत घातक समजली जाते. त्यानंतर अकोला येथील एक्यूआय २०७०, नगर येथील एक्यूआय १९५१, पुणे येथील एक्यूआय १७४१, जळगावला तो १०८५ आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये चंद्रपुर- ४५५, अमरावती- ६८४ परभणी- ६९८, जालना- ४४२, लातुर- ५३४, कोल्हापूर- ६१८, सांगली- ४६५, नाशिक- ७२८, धुळे- ४८६, संभाजीनगर- ३८८, सोलापूर-३१२ अशी एक्यूआयची स्थिती आढळून आली.
फटाक्यांमुळे आरोग्यावर परिणाम
फटाक्यांमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतात. फटाक्यात वापरात येणारी धातू निर्माण होणारा आवाज आणि रसायने उदा.सल्फर, झिंक,कॉपर, सोडियम इ हे आरोग्यासाठी धोकादायक असून त्यामुळे श्वसनाचे रोग,त्वचा रोग,ह्रदय रोग,मानसिक रोग उद्भवतात, असे चोपणे यांनी यानिमित्ताने सांगितले.
हेही वाचा :

चंद्रपूर : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात सरपंच संघटनेचा एल्गार
Delhi Pollution Issue : प्रदूषणाच्या मुद्द्यावर दिल्ली सरकार विरुद्ध भाजपचे राजकीय फटाके
Pimpri News : अनधिकृत फटाके स्टॉलवर कारवाई

The post नागपुरातील हवा बिघडली; महाल परिसरात सर्वाधिक प्रदुषण appeared first on पुढारी.

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे नागपुरात प्रदूषण वाढले आहे. याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. सर्वाधिक प्रदुषण रविवारी वर्दळ, गजबजलेल्या आणि संघ मुख्यालय असलेल्या महाल परिसरात झाले असल्याची नोंद झाली आहे. महाल परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १२५६ पेक्षाही जास्त आढळून आला आहे. ग्रीन प्लॅनेटचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे …

The post नागपुरातील हवा बिघडली; महाल परिसरात सर्वाधिक प्रदुषण appeared first on पुढारी.

Go to Source