तारक मेहता का उल्टा चष्मा फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता गुरूचरण सिंग (Gurcharan Singh) सोमवारपासून बेपत्ता आहे. तारक मेहता कार्यक्रमात तो मिस्टर सोढीची भूमिका साकारत होता. त्याच्या कुटुंबीयांकडून गुरूचरण सिंग बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी गुरचरण सिंगच्या (Gurcharan Singh) अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, त्याआधारे पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे की, गुरुचरण सिंह (Gurcharan Singh) २२ एप्रिल रोजी सकाळी मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाले होते. सकाळी साडेआठ वाजता दिल्ली विमानतळावरून त्यांचे मुंबईसाठी विमान होते. पण त्यांनी ना फ्लाईट घेतली ना मुंबई गाठली. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, ज्यामध्ये गुरुचरण सिंग तेथून जाताना दिसत आहे. त्याचा फोन देखील २४ एप्रिलपर्यंत सुरू होता, परंतु आता तो बंद आहे. बेपत्ता होण्यापूर्वी गुरचरण सिंग फोनवर कोणाशी बोलले होते का, याचा पोलीस तपास करत आहेत.