मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अद्याप थांबताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या एका दिवसानंतर कुकी दहशतवाद्यांनी नरसेना भागात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.
मणिपूर पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. कुकी अतिरेक्यांनी शुक्रवारी मध्यरात्री हल्ला केला. या हल्ल्यात शहीद झालेले जवान हे बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या १२८ व्या बटालियनचे होते.
Two Central Reserve Police Force (CRPF) personnel lost their lives in an attack by Kuki militants starting from midnight till 2:15 am at Naransena area in Manipur. The personnel are from CRPF’s 128 Battalion deployed at Naransena area in Bishnupur district in the state: Manipur…
— ANI (@ANI) April 27, 2024
