नागपूर, रामटेकचा निकाल 17 फेऱ्यांमधून; मतटक्का कमी पण, नवीन मतदार 24 हजारनी वाढले !

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम पोलिसांच्या देखरेखीखाली कळमना येथे स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणीच्या 17 फेऱ्यामधून निकाल अपेक्षित असून प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी अनुक्रमे 20 टेबल्स लावण्यात आले आहेत. सहा विधानसभा मतदार संघासाठी ही संख्या 120 टेबल्स एवढी एका लोकसभा मतदार संघासाठी राहील असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाले, यावेळी मतदानाचे प्रमाण कमी झाले असले तरी मागील लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत 24 हजार 837 इतके मतदार वाढले आहेत. 19 एप्रिल रोजी ज्या मतदारांना मतदान करता आले नाही त्यांनी नमूना 7 व 8 भरुन सादर करावा. ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे मतदारांचे प्रश्न निर्माण झाले त्या बाबींची कार्यालयीन शहानिशा करुन त्यांचे नाव मतदार यादीत घेतले जाईल, असे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी सांगितले.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार उपस्थित होते.
हेही वाचा :
सिंधुदुर्ग : दुचाकी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू
Lok Sabha Election : “हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या पायाला भिंगरी”
