सिंधुदुर्ग : दुचाकी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू

दोडामार्ग, Bharat Live News Media वृत्तसेवा : समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने हुल दिल्याने दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी कलमठाणा येथे शुक्रवारी (दि.२६) हा अपघात झाला. भाविक गुरुदास गवस ( वय १७, रा .सासोली ) असे या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे सासोली गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भाविक गवस हा युवक आपल्या मित्राबरोबर दोडामार्गहून सासोलीच्या दिशेने निघाला होता. मणेरी कलमठाणा येथे ते आले असता समोरून येणाऱ्या वाहनाने त्यांना हूल दिली. यावेळी घाबरलेल्या भाविकचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याकडेला असलेल्या दुभाजकाला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात भाविक गंभीर जखमी झाला, तर त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. जखमी अवस्थेत भाविकला प्रथम येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून बांबोळी गोवा येथे उपचारासाठी नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मित्राचे नाव मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही.
हेही वाचा :
नांदेडमध्ये मलाबार ज्वेलर्सच्या शोरूमला भीषण आग
बीड : तलवाडा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार
नागपुरात चार हजारावर वीजचोऱ्या उघड; 149 लोकांवर गुन्हे दाखल
