पंजाबने इतिहास रचला; आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने टी-2 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाबने इतिहास रचला आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताने कोलकाताने दिलेल्या 262 धावाचे आव्हान पंजाबने अवघ्या 18.4 षटकांत 262 धावांचे लक्ष्य गाठले. 262 धावसंख्येचा पाठलाग हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पाठलाग आहे. या ऐतिहासिक खेळीमध्ये पंजाबच्या विजयाचे नायक जॉनी बेअरस्टो, शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग होते.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 6 गडी गमावून 261 धावा केल्या. फिल सॉल्टने 37 चेंडूत 75 तर सुनील नरेनने 32 चेंडूत 71 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना प्रभासिमरन सिंगने 20 चेंडूत 54 धावांची खेळी करत पंजाबला झंझावाती सुरुवात करून दिली. यानंतर जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूत 108 धावा आणि शशांक सिंगने 28 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी करत पंजाबला विजयाकडे नेले. या सामन्यात 42 षटकार मारले गेले, जे आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही सामन्यातील सर्वाधिक आहे.
या विजयासह पंजाबचा संघ नऊ सामन्यांत तीन विजय आणि सहा पराभवांसह सहा गुणांसह आठव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर कोलकाता संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. आठ सामन्यांत पाच विजय आणि तीन पराभवांसह त्यांचे 10 गुण आहेत.
