परभणी : पांगरा येथे रात्री ८ पर्यंत मतदान; नागरिक त्रस्त

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरा-लासीना येथील परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ मतदान केंद्रावर आज (दि.२६) मतदान झाले. यावेळी मतदानाची वेळ संपण्यापुर्वी काही नागरिक मतदान केंद्रावर दाखल झाल्याने व ईव्हीएम मशिन धिम्या गतीने चालल्याने पांगरा येथील मतदान केंद्रावर आज (दि.२६) रात्री ८ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. पांगरा येथील बुथ क्रमांक २३४ या मतदान केंद्रावर …

परभणी : पांगरा येथे रात्री ८ पर्यंत मतदान; नागरिक त्रस्त

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरा-लासीना येथील परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ मतदान केंद्रावर आज (दि.२६) मतदान झाले. यावेळी मतदानाची वेळ संपण्यापुर्वी काही नागरिक मतदान केंद्रावर दाखल झाल्याने व ईव्हीएम मशिन धिम्या गतीने चालल्याने पांगरा येथील मतदान केंद्रावर आज (दि.२६) रात्री ८ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.
पांगरा येथील बुथ क्रमांक २३४ या मतदान केंद्रावर अनेक मतदार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी दाखल झाले. तसेच ईव्हीएम मशिन देखील धिम्या गतीने चालत असल्याने रात्री ८ वाजेपर्यंत येथे मतदान पार पडले. शिवाय येथील आणखी एका बुथवर मतदाराची संख्या अधिक असल्याने मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागला. पांगरा येथील मतदारांसाठी दोन मतदान केंद्रे असल्याने ही समस्या उद्भवत असल्याने पुढील निवडणुकीत येथे आणखी दोन मतदान केंद्रे व्हावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडल्याने नागरिकांसह, निवडणूक कर्मचारी व पोलिसांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा :

Lok Sabha Election : जळगाव मतदार संघात चार, रावेर लोकसभा मतदार संघात दोन अर्ज अवैध
अरविंद केजरीवालांच्या पत्नी देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार
Manoj Jarange-Patil: मतदान करताना आपली लेकरं डोळ्यासमोर ठेवा: जरांगे-पाटील