नांदेडमध्ये मलाबार ज्वेलर्सच्या शोरूमला भीषण आग

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : शहरातील श‍िवाजी नगर भागातील मलाबार ज्वेलर्सच्या दुकानाला आज (दि.२६) सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. जवळच असलेल्या अग्निशमन दलामुळे अवघ्या पाच ते दहा म‍िनिटात आगीवर नियंत्रण मिळविता आले. शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नांदेड शहरात मुख्य रस्त्यावर मलाबार ज्वेलर्सचे शोरूम …

नांदेडमध्ये मलाबार ज्वेलर्सच्या शोरूमला भीषण आग

नांदेड; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील श‍िवाजी नगर भागातील मलाबार ज्वेलर्सच्या दुकानाला आज (दि.२६) सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने अचानक रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. जवळच असलेल्या अग्निशमन दलामुळे अवघ्या पाच ते दहा म‍िनिटात आगीवर नियंत्रण मिळविता आले. शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नांदेड शहरात मुख्य रस्त्यावर मलाबार ज्वेलर्सचे शोरूम आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या शोरूमला सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट वाहू लागले. या भीषण घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाने घटनास्थळी काही वेळातच आग आटोक्यात आणली. मतदानामुळे आज हे शोरून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथे कोणीही कर्मचारी नव्हते. शार्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा :

Lok Sabha Election : लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर येत्या निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवावी : शरद पवार

लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण सिंह यांची याचिका न्यायालयाने फेटाळली
Lok Sabha Election 2024 |नांदेड: रामतीर्थ येथे तरुणाने ईव्हीएम मशीन फोडली