बीड : तलवाडा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार

बीड, पुढारी वृत्तसेवा : भरधाव ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. जिल्ह्यातील तलवाडा येथील चव्हाणवाडी फाट्याजवळ शुक्रवारी (दि.२६) हा अपघात झाला. लक्ष्मण शाहू उमाप (वय ३०, रा.अंतरवाली बुद्रुक ता.गेवराई) असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मण उमाप हे काही कामानिमित्त आपल्या पत्नीसह मोटरसायकलवरून …

बीड : तलवाडा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार

बीड, Bharat Live News Media वृत्तसेवा : भरधाव ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे. जिल्ह्यातील तलवाडा येथील चव्हाणवाडी फाट्याजवळ शुक्रवारी (दि.२६) हा अपघात झाला. लक्ष्मण शाहू उमाप (वय ३०, रा.अंतरवाली बुद्रुक ता.गेवराई) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मण उमाप हे काही कामानिमित्त आपल्या पत्नीसह मोटरसायकलवरून जात होते. तलवाडा येथील चव्हाणवाडी फाट्याजवळ ते आले असता त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात लक्ष्मण उमाप यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्यावर बीड येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :

नागपुरात चार हजारावर वीजचोऱ्या उघड; 149 लोकांवर गुन्हे दाखल
छ. संभाजीनगर: बनावट कागदपत्रे सादर करत मलकापूर बँकेला ९ कोटींचा गंडा; दोघांना अटक
बीड – पिंपळनेर रस्त्यावर टॅम्पो-मोटारसायकलचा अपघात, एक ठार