पॉवर प्लेमध्ये कोलकाताने कुटल्या 76 धावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा कर्णधार करणने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी जॉनी बेअरस्टोचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे. त्याचबरोबर कोलकाताने प्लेइंग-11 मध्येही बदल केला आहे. मिचेल स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी दुष्मंथा चमीराचा संघात समावेश करण्यात …

पॉवर प्लेमध्ये कोलकाताने कुटल्या 76 धावा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा कर्णधार करणने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी जॉनी बेअरस्टोचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे. त्याचबरोबर कोलकाताने प्लेइंग-11 मध्येही बदल केला आहे. मिचेल स्टार्कच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी दुष्मंथा चमीराचा संघात समावेश करण्यात आला आहे. चमीराला स्टार्कने केकेआरसाठी पदार्पण कॅप दिली.
पॉवर प्लेमध्ये कोलकाताने कुटल्या 76 धावा
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने पॉवर प्लेमध्ये बिनबाद 76 धावा केल्या. सध्या सुनील नरेन 15 चेंडूत 38 धावा तर, फिल सॉल्ट 21 चेंडूत 35 धावांवर फलंदाजी करत आहे. सहाव्या षटकात अर्शदीपच्या चेंडूवर कर्णधार सॅम करनने सॉल्टचा सोपा झेल सोडला. त्यानंतर सॉल्ट 34 धावांवर खेळत होता. पंजाबला ही भागीदारी तोडावी लागेल, अन्यथा दोघेही पंजाबसाठी धोकादायक ठरू शकतात.

🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @KKRiders
Follow the Match ▶️ https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/3b5VbVdr2J
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024

हेही वाचा :

नागपुरात चार हजारावर वीजचोऱ्या उघड; 149 लोकांवर गुन्हे दाखल
Lok Sabha Election | नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल
Rinku Bansode Murder Case : ‘त्या’ हल्लेखोरास पाच दिवस पोलिस कोठडी