निशी-नीराजच्या लग्नात निशीचा खास लुक व्हायरल (photos)
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशी तिच्या लग्नामुळे खूप आनंदात आहे तिला जसे हवे होते तसं तिचं लग्न होत आहे.
संबंधित बातम्या
Salman Khan’s Firing Case : कोर्टाने दोन्ही शस्त्र पुरवठादारांना मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले
Smita Patil : स्मिता पाटील यांच्या मंथन चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर, कान फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग
Adishakti मालिकेत झळकणार सुयश टिळक-पल्लवी पाटील
निशी म्हणजे, दक्षता जोईलने आपल्या या लुकबद्दल बोलताना सांगितले आहे की, ” तर फायनली निशीला जसं हवं होतं तसं लग्न होतं आहे, म्हणून निशी खूप खुश आहे. गेल्यावेळी निशीचा लुकमध्ये खूप साधेपण होता आणि त्या लुकच्या ही प्रतिक्रिया खूप छान मिळाल्या होत्या. म्हणून तो फील न सोडता कोकणाला टच देऊन फ्रेश रंग आणि साडीची स्टाईल ठेवली आहे. मेकअप अगदी सुद्धा सिम्पल पण चांगला दिसेल असा ठेवला आहे. अपेक्षा आहे की प्रेक्षकांना हा ही लुक आवडेल.”
पण या लग्नात असा कोणतरी आहे ज्याच्या चेहऱ्यावर १२ वाजले आहेत. कारण, त्याच्या लग्नाचा विचार खोत कुटुंब करत आहे आणि श्रीनुची वधू म्हणून ते चारूचा विचार करत आहे. श्रीनुच्या हृदयात ओवी आहे यांची कल्पना खोत कुटुंबाला नाही. पण चारूच्या मनात श्रीनू भरलाय. ती मंजूशी बोलताना सतत त्याचा उल्लेख करते. दादाखोत सुद्धा चारूसाठी स्थळं बघत आहेत. सुरुवातीला चारूच्या वागण्याकडे फारसं लक्ष न देणारा श्रीनू आता सावध राहत आहे. त्यातून लाली सुद्धा मुद्दाम काही गोष्टी घडवून आणण्यासाठी धडपडते आहे.
अशातच ओवीचा वाढदिवस ही आहे. चारुला आता दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागलेली आहे. त्यामुळे ओवीचा वाढदिवस श्रीनूला साजरा करता नाही. याच्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हे सर्व चालू असताना दुसरीकडे निशी आणि नीराजच्या लग्न विधी सुरु आहेत. खूप काळानंतर घरात एक मंगल कार्य पार पडत आहे म्हणून सगळे आनंदात आहेत. ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील सगळ्या गोंधळात श्रीनु ओवीचा वाढदिवस साजरा करू शकेल का? हे पाहायला मिळणार आहे.