स्मिता पाटील यांच्या मंथन चित्रपटाचे कान फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ चित्रपट १९७६ मध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट प्रतिष्ठित कान फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील मुख्य भूमिकेत होत्या.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचा १९७६ मध्ये रिलीज झालेला क्लासिक चित्रपट ‘मंथन’ प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात सामील केला जाईल. महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ‘मंथन’चे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील दिसत आहेत. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला आहे.
‘मंथन’ च्या पोस्टरसोबत बिग बींनी एक लांबलचक नोट लिहिली आहे. त्यांनी लिहिलंय, ‘खूप अभिमान आहे की, चित्रपट विश्व प्रीमियर सोबत फिल्म फेस्टिवलमध्ये होईल…’
पाच लाख शेतकऱ्यांचे योगदान
स्मिता पाटील यांचा ‘मंथन’ चित्रपट भारताच्या कृषी परिदृश्यात क्रांतिकारी युगाची कहाणी दर्शवतो. ‘मंथन’ भारताचा पहिला क्राउडफंडेड चित्रपटांपैकी एक असल्याने त्याचे खूप कौतुक झाले होते. ज्यामध्ये पाच लाख शेतकऱ्यांनी चित्रपटाच्या निर्मिती सहाय्यतेसाठी दोन-दोन रुपयांचे योगदान दिले होते. त्याकाळी चित्रपट समीक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली होती. १९७७ मध्ये हिंदीमध्ये सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले होते. १९७६ च्या अकादमी पुरस्कारांमध्येही भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.
View this post on Instagram
A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)