‘राहुल गांधी औकातीत राहा’, चंद्रशेखर बावनकुळे भडकले

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : पराभवाच्या भीतीने पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करू नका, औकातीत राहा या शब्दात राहुल गांधींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भडकले. सोलापुरात राहुल गांधींकडून मोदीजींचा एकेरी उल्लेख झाला असा आरोप करीत, गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है, त्यामुळे जनताच काँग्रेसला धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी सोशल मीडियावरून दिला आहे. बावनकुळेंनी म्हटलंय …

‘राहुल गांधी औकातीत राहा’, चंद्रशेखर बावनकुळे भडकले

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : पराभवाच्या भीतीने पंतप्रधान मोदींचा एकेरी उल्लेख करू नका, औकातीत राहा या शब्दात राहुल गांधींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भडकले. सोलापुरात राहुल गांधींकडून मोदीजींचा एकेरी उल्लेख झाला असा आरोप करीत, गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है, त्यामुळे जनताच काँग्रेसला धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी सोशल मीडियावरून दिला आहे.
बावनकुळेंनी म्हटलंय की, काँग्रेस नेत्यांकडून पीएम मोदींना कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून हिणवलं गेलं. पण प्रत्येकवेळी जनतेनंच काँग्रेसला धडा शिकवला. आता मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर एकही जागा राज्यात काँग्रेसला मिळणार नाही, असे भाकित त्यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केले आहे.
‘देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे. शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला,’ असेही बावनकुळे म्हणाले आहेत.