शिरपूरला आक्रोश मोर्चाला हिंसक वळण, मोर्चेकरींची पोलीस ठाण्यावर दगडफेक
धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा– शिरपूर तालुक्यातील करवंद येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाला हिंसक वळण लागले. मोर्चेकर्यांनी केलेल्या दगडफेकी मध्ये चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून आता सुमारे 80 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील करवंद येथील आनंद नगरात साखरपुड्याच्या कार्यक्रमात किरकोळ कारणामुळे वाद झाल्यामुळे जामा नामु भिल यास विजय सुदाम कोळी, गोकुळ शिरसाठ उर्फ कोळी व सुदाम पुंजु कोळी यांनी जीवे ठार मारले. या घटनेमुळे आनंद नगर परिसरातील आदिवासी समाजामध्ये मोठा रोष निर्माण झाला. या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, तसेच त्यांना जमावाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मयताचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तसेच बहुसंख्य तरुणांच्या हातात लाकडी दांडके होते. हा मोर्चा शिरपूर पोलीस ठाण्याजवळ पोहोचला. यावेळी साखरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केके पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी मोर्चेकरी तरुणांची चर्चा सुरू केली. यावेळी बॅरिकेटिंग लावून मोर्चाला अडवण्यात आले. तसेच पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक के के पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी मोर्चेकरी तरुणांची चर्चा सुरू केली. त्यांची समजूत पोलीस अधिकारी काढण्याचा प्रयत्न करीत होते .मात्र मोर्चेकरी आपला रोष व्यक्त करीत होते .आरोपींना आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यानंतर मोर्चामधील काही लोकांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तहसिलदार हे चर्चा करीत असतांना जितेंद्र तिरसिंग भिल, लुका शंकर पवार उर्फ भिल, सुरेश सिताराम भिल, मोहसीन समदखान पठाण, योगेश संदीप भिल, राहुल पंढरीनाथ भिल, खंड्या रतिलाल भिल, कोकीळाबाई देवराज भिल, अल्काबाई गोरख भिल, ज्योतीबाई संतोष भिल, इंदुबाई धर्मा भिल व गोडमबाई भिल सर्व रा. आनंदवाडी, करवंद, ता. शिरपूर यांच्यासह अन्य ७० ते ८० जणांच्या जमावाने त्यांच्या हातातील दगड, विटा व लाकडी दांडके, लोखंडी गज, छताचे कौल पोलिसांच्या दिशेने फेकुन पोलिसांना मारहाण केली. शिवाय जमावाने लोखंडी गेटचा कडीकोयंडा, बॅरेकेट तोडले, सीसीटीव्हीची तोडफोड केली.यात पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा पाटील, प्रतिभा देशमुख, मुन्नी तडवी, यांच्यासह दंगा काबु पथकातील मनोज पंडीत हे कर्मचारी जखमी झाले. जखमी झालेल्या वरील चौघा कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.
जमाव हिंसक झाल्याने पोलीस पथकाने बाळाचा वापर करून जमाव पांगवला यानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,जितेंद्र तिरसिंग भिल, लुका शंकर पवार उर्फ भिल, सुरेश सिताराम भिल, मोहसीन समदखान पठाण, योगेश संदीप भिल, राहुल पंढरीनाथ भिल, खंड्या रतिलाल भिल, कोकीळाबाई देवराज भिल, अल्काबाई गोरख भिल, ज्योतीबाई संतोष भिल, इंदुबाई धर्मा भिल व गोडमबाई भिल सर्व रा. आनंदवाडी, करवंद, ता. शिरपूर व त्यांचेसोबत असलेल्या ७० ते ८० जणांवर भादंवि कलम ३२३, ३३२, ३५३,३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम ३(१) (३) चे उल्लंघन १३५, सह क्रीमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट १९३२ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा –
Lok Sabha Election | नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल
Stock Market Closing Bell | प्रॉफिट बुकिंग! सेन्सेक्स, निफ्टीच्या ५ दिवसांच्या तेजीला ब्रेक, Bajaj चे शेअर्स गडगडले
Nayanthara : शाहरुखची हिरोईन क्लासी लूकमध्ये, लेडी सुपरस्टारचे फोटो-व्हिडिओ व्हायरल