बीड – पिंपळनेर रस्त्यावर टॅम्पो-मोटारसायकलचा अपघात, एक ठार
पिंपळनेर Bharat Live News Media वृत्तसेवा : बीड-पिंपळनेर रस्त्यावर नागपूर फाट्याच्या नजीक रानुबाई नगर जवळ टेम्पो आणि मोटरसायकलस्वाराचा जोरदार अपघात झाल्याची घटना आज दि. २६ रोजी घडली. या आपघातात मोटरसायकलस्वर ठार झाला आहे. या अपघातात ठार झालेल्या गोविंद श्रीकीसन घोलप (रा. उमरी, ता. जि. बीड) असे मोटरसायकल चालकाचे नाव आहे. सदरील माहिती पिंपळनेर पोलिसांनी दिली आहे.
टेम्पो आणि मोटरसायकलची जोरदार धडक झाल्याची माहिती बीड पिंपळनेर रस्त्यावरील अपघात स्थळावरील प्रथम दर्शनींकडून सांगण्यात आले. अपघातात मोटरसायकलचा चक्काचूर झाल्याचे निदर्शनास आले.