भारताच्या सीमेवर उगवला नवा देश!
आयझोल; वृत्तसंस्था : म्यानमारमधून भारतीय हद्दीत सुरू असलेल्या घुसखोरीदरम्यान मिझोराममधील संकटांत वाढ झालेली आहे. म्यानमार लष्कराविरुद्ध लढत असलेल्या लोकशाही समर्थक चीन डिफेन्स जॉईंट फोर्सेसने भारत-म्यानमार सीमेवरील म्यानमार हद्दीतील तिआऊ-खाव्मावीवर ताबा मिळविलेला आहे. हा आमचा नवा देश आहे म्हणून भारतीय सीमेवर असलेल्या गेटवर या गटाने ‘वेलकम टू चीनलँड’ असा फलक लावलेला असून चीनलँड या नव्या देशाचा झेंडाही फडकवला आहे.
शहराचे नागरी प्रशासनही या गटाने ताब्यात घेतले आहे. मिझोराममध्ये घुसखोरी केलेल्या 800 म्यानमार नागरिकांना घरवापसीसाठी या नव्या देशाने हिरवा झेंडाही दिला आहे.
भारतीय सीमेवर गस्त वाढली
जे काही घडलेले आहे, ते म्यानमारच्या हद्दीत घडलेले आहे. भारतीय हद्दीतील परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात आहे, असे भारतीय लष्करी अधिकार्यांनी सांगितले. सीमेवर आसाम रायफल्सची गस्त वाढविण्यात आली आहे, अशी माहितीही या अधिकार्याने दिली.
The post भारताच्या सीमेवर उगवला नवा देश! appeared first on पुढारी.
आयझोल; वृत्तसंस्था : म्यानमारमधून भारतीय हद्दीत सुरू असलेल्या घुसखोरीदरम्यान मिझोराममधील संकटांत वाढ झालेली आहे. म्यानमार लष्कराविरुद्ध लढत असलेल्या लोकशाही समर्थक चीन डिफेन्स जॉईंट फोर्सेसने भारत-म्यानमार सीमेवरील म्यानमार हद्दीतील तिआऊ-खाव्मावीवर ताबा मिळविलेला आहे. हा आमचा नवा देश आहे म्हणून भारतीय सीमेवर असलेल्या गेटवर या गटाने ‘वेलकम टू चीनलँड’ असा फलक लावलेला असून चीनलँड या नव्या देशाचा …
The post भारताच्या सीमेवर उगवला नवा देश! appeared first on पुढारी.