लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील 167 उमेदवारांवर गंभीर गुन्हे

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात निवडणूक लढवत असलेल्या 1192 उमेदवारांपैकी 250 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे असून 167 उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. विविध प्रकरणात 32 उमेदवार दोषी आढळले आहेत तर, तीन उमेदवारांवर खुनाचे खुन्हे आहेत तसेच24 उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉचने दुसर्‍या टप्प्यात निवडणूक …

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील 167 उमेदवारांवर गंभीर गुन्हे

नवी दिल्ली : Bharat Live News Media वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात निवडणूक लढवत असलेल्या 1192 उमेदवारांपैकी 250 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे असून 167 उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. विविध प्रकरणात 32 उमेदवार दोषी आढळले आहेत तर, तीन उमेदवारांवर खुनाचे खुन्हे आहेत तसेच24 उमेदवारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉचने दुसर्‍या टप्प्यात निवडणूक लढवणार्‍या 1192 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
महिलांचा छळ केल्याप्रकरणी 25 उमेदवारांवर तर एका उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय 21 उमेदवारांवर भडकाऊ भाषणे केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रनवर सर्वाधिक 243 गुन्हे दाखल आहेत. तर एर्नाकुलममधील भाजपचे उमेदवार डॉ. के.एस. राधाकृष्णन यांच्यावर एकूण 211 प्रकरणे आहेत, त्यापैकी 5 गंभीर प्रकरणे आहेत. इडुक्की येथील काँग्रेसचे डीन कुरियाकोसे यांच्यावर 88 खटले आहेत, त्यापैकी 23 अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये मोडतात.
कोणत्या पक्षाच्या किती उमेदवारांवर गुन्हे?
काँग्रेसच्या 68 पैकी 35 (51 टक्के) उमेदवारांवर आणि भाजपच्या 69 पैकी 31 (45 टक्के) उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. सीपीआयचे पाच उमेदवार आहेत. सर्वांवर गुन्हे दाखल आहेत. सपाकडून चारपैकी चार (100 टक्के), सीपीआय(एम) मधून 18 पैकी 14 (78 टक्के), शिवसेनेकडून तीनपैकी दोन (67 टक्के), शिवसेनेकडून चारपैकी दोन (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( 50 टक्के) आणि जेडीयू च्या पाच पैकी दोन (40 टक्के) उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.
भाजपचे 69 पैकी 21, काँग्रेसचे 68 पैकी 22, सपाचे चारपैकी दोन, भाकपचे पाचपैकी तीन, माकपचे 18 पैकी सात, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चारपैकी एक आणि जेडीयूच्या पाचपैकी एका उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.