प्रॉफिट बुकिंग! सेन्सेक्स, निफ्टीच्या ५ दिवसांच्या तेजीला ब्रेक, Bajaj चे शेअर्स गडगडले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील मागील ५ सत्रांतील तेजीला शुक्रवारी (दि.२६) ब्रेक लागला. जागतिक कमकुवत संकेत आणि प्रॉफिट बुकिंगमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी घसरून बंद झाले. सेन्सेक्स ६०९ अंकांनी घसरून ७३,७३० वर बंद झाला. तर निफ्टी १५० अंकांच्या घसरणीसह २२,४१९ रुपयांवर स्थिरावला. भारतीय शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. पण ही तेजी अधिक …

प्रॉफिट बुकिंग! सेन्सेक्स, निफ्टीच्या ५ दिवसांच्या तेजीला ब्रेक, Bajaj चे शेअर्स गडगडले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारातील मागील ५ सत्रांतील तेजीला शुक्रवारी (दि.२६) ब्रेक लागला. जागतिक कमकुवत संकेत आणि प्रॉफिट बुकिंगमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी घसरून बंद झाले. सेन्सेक्स ६०९ अंकांनी घसरून ७३,७३० वर बंद झाला. तर निफ्टी १५० अंकांच्या घसरणीसह २२,४१९ रुपयांवर स्थिरावला. भारतीय शेअर बाजाराने आज तेजीत सुरुवात केली होती. पण ही तेजी अधिक वेळ टिकून राहिली नाही. (Stock Market Closing Bell)
आज निफ्टी बँक, इन्फ्रा आणि ऑटो शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. ऑटो, बँक, कॅपिटल गुड्स वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. पॉवर, ऑइल आणि गॅस, हेल्थकेअर, रियल्टी, मीडिया ०.३-१ टक्क्याने वाढले. बीएसई मिडकॅप ०.८ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी वाढून बंद झाला.
कोणते शेअर्स घसरले?
सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचा शेअर्स टॉप लूजर्स ठरला. हा शेअर्स तब्बल ७ टक्क्यांनी घसरला. त्याचबरोबर बजाज फिनसर्व्हचा शेअर्स ३.५ टक्क्यांनी खाली आला. इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक बँक, एचसीएल टेक, सन फार्मा, एसबीआय हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. दरम्यान, टेक महिंद्राचा शेअर्स टॉप गेनर होता. हा शेअर ७ टक्क्यांनी वाढला. विप्रो, आयटीसी या शेअर्समध्ये किरकोळ वाढ दिसून आली.
sensex closing
 

निफ्टीवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, नेस्ले इंडिया आणि एम अँड एम हे शेअर्स सर्वाधिक घसरले. तर टेक महिंद्रा, डिव्हिज लॅब, LTIMindtree, बजाज ऑटो, बीपीसीएल या शेअर्समध्ये सर्वांधिक वाढ दिसून आली. (Stock Market Closing Bell)
Nifty 50
Bajaj च्या ‘या’ दोन शेअर्सना फटका, कारण काय?
आजच्या ट्रेडिंग सत्रात बजाज फायनान्सचे शेअर्स (Bajaj Finance shares) गडगडले. हा शेअर्स बीएसईवर ७ टक्क्यांनी घसरून ६,७२० रुपयांवर आला. (Bajaj Finance Share Price) या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने १ एप्रिल २०२४ पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात त्यांच्या मालमत्तेमध्ये २६ टक्के आणि २८ टक्क्यांच्या दरम्यान वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मागील वर्षातील ३४ टक्के वाढीच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. बजाज फिनसर्व्हचाही शेअर्स ३ टक्क्यांनी घसरून १,५८० रुपयांपर्यंत खाली आला. (Bajaj Finserv shares)
नेस्ले इंडियातही घसरण
नेस्ले इंडियाचे शेअर्स एनएसईवर आज ३ टक्क्यांनी घसरून २,४७८ रुपयांपर्यंत खाली आले. नेस्लेने गुरुवारी चौथ्या तिमाहीचे आकडे जाहीर केले. त्यांचा स्टँडअलोन निव्वळ नफा मार्च तिमाहीत वार्षिक २७ टक्के वाढून (YoY) ९३४ कोटी झाला आहे. जो एका वर्षापूर्वी ७३७ कोटी होता. (Nestle India Share Price)
‘टेक महिंद्रा’च्या शेअर्सची उसळी
टेक महिंद्राचा शेअर्स (TechM shares) आज बीएसईवर ७ टक्क्यांनी वाढून १,२८० रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे या आयटी कंपनीचे चौथ्या तिमाहीचे (Q4 FY24) कमकुवत निकाल असूनही त्यांचे शेअर्स वधारले. TechM ने मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत नफ्यात ४१ टक्के घसरण नोंदवली. दरम्यान, वेदांताचा शेअर्स बीएसईवर सुमारे ४ टक्क्यांनी वाढून ४०२ रुपयांवर पोहोचला. (Vedanta Share Price)
परदेशी गुंतवणूकदार
NSE च्या आकडेवारीनुसार, २५ एप्रिल रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) २,८२३.३३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) ६,१६७.५६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
हे ही वाचा :

Whisky बनवणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्सला रोज लागतंय अप्पर सर्किट! कारण काय?
पोस्टाची ग्रामसुरक्षा योजना; वृद्धापकाळात बनेल आधार
आता सतत KYC ची गरज नाही, ‘युनिफॉर्म केवायसी’ लागू होणार, जाणून घ्या याविषयी