रक्षा खडसे अपात्र होण्यापासून वाचल्या, अपक्ष उमेदवाराचा आक्षेप 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – रावेर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवाराने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यावर आक्षेप नोंदवला होता. मात्र वेळेत पुरावे सादर न करू शकल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे रक्षा खडसे अपात्र होण्यापासून वाचल्या असल्याचा दावा करण्यात आला असून अपक्ष उमेदवार या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे माध्यमांशी  बोलताना सांगितले. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ …

रक्षा खडसे अपात्र होण्यापासून वाचल्या, अपक्ष उमेदवाराचा आक्षेप 

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – रावेर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवाराने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यावर आक्षेप नोंदवला होता. मात्र वेळेत पुरावे सादर न करू शकल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे रक्षा खडसे अपात्र होण्यापासून वाचल्या असल्याचा दावा करण्यात आला असून अपक्ष उमेदवार या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे माध्यमांशी  बोलताना सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. अपक्ष उमेदवार संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार रक्षा निखिल खडसे यांच्यावर अक्षेप नोंदविला. निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे पत्र दिले. मात्र दिलेल्या वेळेत पुरावे सादर न करू शकल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
संजय प्रल्हाद कांडलकर म्हणाले, एसआयटी चौकशीमध्ये खडसे कुटुंबांला 137 कोटींचा दंड गौण खनिज प्रकरणांमध्ये आकारण्यात आलेला आहे. या संबंधित नोटीस देण्यात आल्या होत्या. मध्यंतरी शासनाकडून यावर स्थगिती आणली होती. या विरोधात तक्रारदार मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे हायकोर्टात गेलेले आहेत. याप्रकरणी 30 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी, प्रांतधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी अधिकारी यांचे लेखी मागवलेले आहे. मात्र रक्षा खडसे यांनी याचा उल्लेख नामनिर्देश पत्र भरताना केलेला नसल्याचं अपक्ष उमेदवार संजय प्रल्हाद कांडलकर यांनी सांगितले. जरी रावेरचे निवडणूक निर्णय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी अर्ज फेटाळलेला जरी असला तरी या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी सांगितले.
हेही वाचा –

आत्तापर्यंत एक कोटी ३९ लाख टन ऊसगाळप : गतवर्षापेक्षा पाच लाख टन अधिक ऊसगाळप
Lok Sabha Elections 2024 : दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज, नेहा शर्मासह अन्य स्टार्सनी बजावला मतदानाचा हक्क (Video)