आत्तापर्यंत एक कोटी ३९ लाख टन ऊसगाळप : गतवर्षापेक्षा पाच लाख टन अधिक ऊसगाळप
किशोर बरकाले
पुणे : जिल्ह्यात यंदाच्या 2023-24 च्या हंगामात आत्तापर्यंत 14 साखर कारखान्यांनी सुमारे एक कोटी 32 लाख 10 हजार 500 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. त्यातून 10.56 टक्के सरासरी उतार्यानुसार एक कोटी 39 लाख 56 हजार 457 क्विंटलइतके साखर उत्पादन
हाती आले आहे. गतवर्षी एक कोटी 26 लाख 91 हजार 658 टनाइतके ऊसगाळप पूर्ण झाले होते. याचा विचार करता सुमारे पाच लाख टनांनी अधिक ऊसगाळप यंदा झाले आहे. ऊसगाळप आणि साखर उत्पादनात बारामती अॅग्रो, दौंड शुगर हे दोन खासगी कारखाने अग्रस्थानी असून, 11.96 टक्क्यांइतका सर्वाधिक उतारा घेत श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अव्वल स्थान मिळविले आहे.
हंगामअखेर कारखान्यांचे ऊसगाळप, साखर उत्पादनात किंचित वाढ होण्याची अपेक्षा असली, तरी सध्याची कारखान्यांची क्रमवारी कायम राहण्याची अपेक्षा आहे. कारण जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांचा हंगाम संपुष्टात आला आहे. जिल्ह्यात सध्या श्रीसोमेश्वर आणि विघ्नहर या दोन सहकारी साखर कारखान्यांचा ऊसगाळप हंगाम सुरू आहे. आणखी आठवडाभर या कारखान्यांचा हंगाम सुरू राहण्याची अपेक्षा असल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.
बारामती शुगरने 21 लाख 54 हजार 794 टनाइतके सर्वाधिक ऊसगाळप केले आहे. तर 9.33 टक्के उतार्यानुसार 19 लाख 86 हजार 725 क्विंटल साखर उत्पादन मिळविले आहे. त्या खालोखाल ऊसगाळप दौंड शुगरने केले असून, ते 18 लाख एक हजार 877 टन आहे. त्यांनी 9.57 टक्के उतार्यानुसार 17 लाख 26 हजार 200 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. मात्र, ऊसगाळपात तिसर्या स्थानावर असलेल्या सोमेश्वरने 15 लाख 20 हजार 425 टन ऊसगाळप पूर्ण केले असून, हा कारखाना अद्याप सुरू आहे. या कारखान्याने आत्तापर्यंत 18 लाख 19 हजार 650 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांचे ऊसगाळप, साखर उत्पादन व टक्केवारी
क्र. कारखाना ऊसगाळप (लाख टन) साखर उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)
1. सोमेश्वर सहकारी 15,20,425 18,19,650 11.96
2. दि माळेगाव सहकारी 13,27,909 15,21,400 11.47
3. श्रीछत्रपती सहकारी 7,29,581 7,79,800 10.45
4. भीमा पाटस सहकारी 4,71,495 5,04,400 9.37
5. विघ्नहर सहकारी 9,93,110 11,08,900 11.57
6. कर्मयोगी सहकारी 3,98,001 3,85,100 9.42
7. श्रीसंत तुकाराम सह. 4,90,515 5,65,000 11.52
8. भीमाशंकर सहकारी 11,09,468 12,74,422 11.46
9. निरा-भीमा सहकारी 3,25,607 2,53,320 8.13
10. श्रीनाथ म्हस्कोबा खासगी 5,95,172 6,10,840 10.33
11. बारामती अॅग्रो खासगी 21,54,794 19,86,725 9.33
12. दौंड शुगर खासगी 18,01,877 17,26,200 9.57
13. व्यंकटेशकृपा खासगी 6,35,150 6,93,500 10.96
14. पराग अॅग्रो खासगी 6,57,397 7,27,200 11.1
एकूण 1,32,10,500 1,39,56,457 10.56
हेही वाचा
Crime News : माजी सभापतींच्या मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
कामा रुग्णालयात 9,127 महिलांचे मॅमोग्राम पद्धतीने स्क्रीनिंग
झव्हेरी बाजारातील सोने तस्करीचा पर्दाफाश; चौघांना अटक