Crime News : माजी सभापतींच्या मुलावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
सासवड : Bharat Live News Media वृत्तसेवा : जुन्या जमिनीच्या वादातून माजी सभापती दादासाहेब घाटे यांचा मुलगा अजय दादासाहेब घाटे (रा. चिदानंद सोसायटी गोकुळनगर, कात्रज) याच्यावर कुटुंबातील दोघांनी प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सासवड पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मंगल दादासाहेब घाटे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 23) दुपारी 12.30 वाजता आस्करवाडी (ता. पुरंदर) येथे काळुबाई मंदिरात आरती झाल्यानंतर पूजा करणारे पुजारी यांच्या अंगात येते, ते पाहण्यासाठी अजय घाटे व फिर्यादी मंगल घाटे मंदिरात बसले होते.
या वेळी जुन्या जमिनीच्या वादातून रायबा धोंडिबा घाटे (51) आणि संकेत रायबा घाटे (वय 25, दोघेही रा. पठारवाडी, ता. पुरंदर) यांनी दोन पिशव्यांमध्ये दोन कोयते आणून अजय घाटेला पाठीमागून कोयत्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. दोन्ही आरोपींना सासवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. दोघांनाही सासवड न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा
कामा रुग्णालयात 9,127 महिलांचे मॅमोग्राम पद्धतीने स्क्रीनिंग
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कारणासाठी बदलता येणार परीक्षेची तारीख
सार्वजनिक शौचालय टेंडर प्रकरणी संजय पानसरे पोलीस कोठडीत