विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कारणासाठी बदलता येणार परीक्षेची तारीख

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा लोकसभा निवडणुकांमुळे विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. येत्या 5 मे रोजी होणारी पीसीएम गटातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांना काही वैयक्तिक कारणासाठी बदल आवश्यक वाटत असल्यास त्यांच्याकडून तशा सूचना …

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कारणासाठी बदलता येणार परीक्षेची तारीख

मुंबई ः Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा लोकसभा निवडणुकांमुळे विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. येत्या 5 मे रोजी होणारी पीसीएम गटातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, उमेदवारांना काही वैयक्तिक कारणासाठी बदल आवश्यक वाटत असल्यास त्यांच्याकडून तशा सूचना इमेलवर मागवण्यात आल्या आहेत.
अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या आणि विद्यार्थी संख्या अधिक असलेली एमएचटी सीईटी परीक्षा गेल्या सोमवारपासून सुरु झाली आहे. यामधील पहिल्या टप्यात पीसीबी ग्रुपमधून परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. यानंतर पीसीएम ग्रुपची परीक्षा सुरु होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना सत्र आणि परीक्षांचा वेळा निश्चित करुन तारीख आदी माहिती प्रवेशपत्रावर देण्यात आली आहे. पीसीएम गटातील ही परीक्षा 5 मे रोजी होणार नाही. तरीही ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेश पत्र प्राप्त झाल्यानंतर या परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणासाठी बदलणे आवश्यक वाटत आहे.
अशा सर्व उमेदवारांनी आपला विनंती अर्ज परीक्षेच्या प्रवेश पत्रासह ाहींलशींलिा2024सारळश्र.लेा या इमेल आयडीवर पाठवावा. या संदर्भातील विनंती 26 एप्रिलपर्यंतच स्विकारली जाईल, असे सीईटी सेलने आपल्या अधिकृत सुचनापत्रात नमुद केले आहे. येत्या 5 मे रोजी होणारी पीसीएम गटातील परीक्षा पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.