अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनिता लोकसभेच्या रिंगणात; AAP ची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा मनी लॉड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षांतील अनेक नेते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालहे सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेची कोणतीही आशा नाही. दरम्यान लोकसभा निवडणुक मतदान प्रक्रियेला देशभरात सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवालांच्या पत्नी सुनिता केजरीवाल लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरत आहेत, अशी …

अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनिता लोकसभेच्या रिंगणात; AAP ची माहिती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा मनी लॉड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षांतील अनेक नेते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालहे सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेची कोणतीही आशा नाही. दरम्यान लोकसभा निवडणुक मतदान प्रक्रियेला देशभरात सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवालांच्या पत्नी सुनिता केजरीवाल लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरत आहेत, अशी माहिती मंत्री आतिशी मारलेना यांनी दिली आहे. त्या आज (दि.२६) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Sunita Kejriwal)
उद्यापासून सुनिता केजरीवाल यांच्या नवीन कारकिर्दीला सुरुवात
दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आणि आप उमेदवारांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरतील. सुनिता केजरीवाल यांच्या नवीन राजकीय कारकिर्दिची सुरुवात उद्या दिल्लीपासून होत आहे. उद्या शनिवार २७ एप्रिल रोजी त्या पूर्व दिल्लीत रोड शो करणार आहेत. तसेच रविवार २८ एप्रिल रोजी त्या पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघात रोड शो करणार आहेत.  (Sunita Kejriwal)
“सुनीता केजरीवाल पंजाब, हरियाणा आणि गुजरातलाही भेट देणार आहेत. दिल्ली, पंजाब तसेच संपूर्ण देशातील जनता अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने मतदान करतील…” असा विश्वास देखील मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. (Sunita Kejriwal)
AAP च्या लोकसभा प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी सुनिता सरसावल्या
दिल्ली मद्य धोरण घोटाळा मनी लॉड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षांतील अनेक नेते वादात आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आपचे हे दोघे मुख्य मंत्री सध्या मनी लॉड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. त्यामुळे आप आदमी पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तीच या प्रकरणात अडकल्याने लोकसभा प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी सुनिता केजरीवाल पुढे सरसावल्या आहेत. (Sunita Kejriwal)

#WATCH | Delhi minister and AAP leader Atishi says, “Arvind Kejriwal’s wife Sunita Kejriwal will enter the fray to protest against Arvind Kejriwal’s arrest and seek votes for AAP candidates. It will start from Delhi tomorrow. On April 27, she will hold a roadshow in East Delhi… pic.twitter.com/Nx8Z7mdqTF
— ANI (@ANI) April 26, 2024