सामंथा रुथ प्रभूने आपल्या वेडिंग गाऊनचं असं काही केलं की…(Video)
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आपल्या चित्रपटांशिवाय फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. ट्रेंडिंग फॅशनची चांगली समज असल्याने फॅशन जगतमध्ये तिचा सम्मान केला जातों. सामंथा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलीय. तिने आपल्या वेडिंग गाऊनचं असं काही केलं की, त्यामुळे तिचे कौतुक होताना दिसते.
फॅशन जगतात दिला संदेश
सामंथाने आला वेडिंग गाऊन पुन्हा डिझाईन करून एक सुंदर काळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस तयार केला आहे. आपल्या सोशल मीडिया अकांऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये डिझायनर्स तिच्या वेडिंग गाऊनला एक नव्या आऊटफिटमध्ये बद लताना दिसत आहेतत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘नेहमी नव्या आठवणी बनवल्या जाऊ शकतात. नेहमी चालण्यासाठी नवे मार्ग खुले होतात. नेहमी सांगण्यासाठी नव्या कहाण्या असतात.
नव्या ड्रेसमध्ये शेअर केले फोटो
सामंथाने लग्नाच्या ड्रेसने बनवलेल्या नव्या ड्रेसमध्ये आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री सामंथाने लिहिलं, ‘आज जो ड्रेस मी घातला आहे, ते क्रेशा बजाजने माझ्या लग्नात घातलेला सुंदर गाऊनला पुन्हा डिझाईन केला आहे. कऊप लोकांना हे महत्वहीन आणि अनावश्यक वाटू शकतं. मी माझ्या सवयी बदलणे आणि लाईफस्टाईलला अधिक टिकाऊ बनवण्यासाठी अनेक पाऊले उचलत आहे…’
हवामान बदलाबाबत जनजागृती केली
या दरम्यान हवामान बदलाबाबत तिने जनजागृती केली. ती म्हणाली, ‘अनेक छोटे-छोटे प्रयत्न देखील महत्वाचे ठरतात. एक छोटा निर्णय देखील महत्वपूर्ण आहे. मी स्वत:पासून ते आपल्या सर्वांपर्यंत अशा प्रकारचे छोटी-छोटी पाऊल उचलण्याचे आग्रह करते’.
सामंथा -सुपरस्टार नागा चैतन्य यांनी ६ ऑक्तोबर, २०१७ रोजी विवाह बंधनात अडकले होते. पण, त्यांने नाते फार काळ टिकले नाही. चार वर्षांनी त्यांनी अलग होण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)
View this post on Instagram
A post shared by Krésha Bajaj (@kreshabajajofficial)