ड्रेनेज लाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण; धायरीकरांनी घेतला मोकळा श्वास

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : धायरीतील दाट लोकवस्तीच्या बेनकर वस्तीसह परिसरात तुंबलेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीचे काम अखेर महापालिकेने पूर्ण केले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘धायरीत साचली मैलापाण्याची डबकी’ या मथळ्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’त प्रसिद्ध होताच प्रशासनाने त्याची दखल घेत जेसीबी मशीन, तसेच वाहनांच्या ताफ्यासह मलःनिस्सारण विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी धायरीत धाव घेत दुरुस्तीचे …

ड्रेनेज लाइनच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण; धायरीकरांनी घेतला मोकळा श्वास

खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : धायरीतील दाट लोकवस्तीच्या बेनकर वस्तीसह परिसरात तुंबलेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीचे काम अखेर महापालिकेने पूर्ण केले आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘धायरीत साचली मैलापाण्याची डबकी’ या मथळ्याचे वृत्त दैनिक ‘Bharat Live News Media’त प्रसिद्ध होताच प्रशासनाने त्याची दखल घेत जेसीबी मशीन, तसेच वाहनांच्या ताफ्यासह मलःनिस्सारण विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी धायरीत धाव घेत दुरुस्तीचे काम सुरू केले. लागोपाठ दोन दिवस जोरदार अवकाळी पाऊस पडल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, ड्रेनेजच्या चेंबरची दुरुस्ती करून गळती बंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. सिंहगड रोड क्षेत्रीय मलनिस्सारण विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी बेनकर नगर, सयाजी प्री-प्रायमरी शाळा रस्त्यासह बेनकर वस्ती रस्त्यावरील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करून गळती बंद केली.

ग्रामपंचायत काळात टाकलेल्या ड्रेनेज लाईनचे चेंबर अनेक ठिकाणी रस्त्यात गाडले आहेत. त्यामुळे तुंबलेल्या लाईनची दुरुस्ती करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे जादा क्षमतेच्या लाईन टाकण्यात याव्यात, यासाठी मलनिस्सारण विभागाला सूचना
दिल्या आहेत.
– संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय 
दाट लोकवस्त्या, सोसायट्यांतील रस्त्याखाली ड्रेनेज लाईनची चेंबर आहेत. चेंबर अनेक ठिकाणी गाडली आहेत. रस्ता फोडून चेंबरची दुरुस्ती, लाईनची सफाई करावी लागत आहे. अरुंद रस्ते असल्याने मशीनरी , वाहने उभी करण्यास अडथळे येत आहेत. ड्रेनेज लाईनचा आकार लहान ,मोठा असल्याने ड्रेनेज लाईन साचत आहे.
– अमर जाधव, सहायक, सिंहगड रोड मलनिस्सारण विभाग

हेही वाचा

अण्णा भाऊ साठे सभागृहाची दयनीय अवस्था; कचरा, राडारोडा, मैलापाण्यासह विविध समस्या
नांदेड लोकसभेसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 20.85 टक्‍के मतदान
वैधमापनच्या पुणे विभाग मालामाल; महसूल 26 कोटींवर : दीड कोटीने वाढ