नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
अकोला Bharat Live News Media वृत्तसेवा: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला तर सिंगापूर येथे शिक्षणानिमित्त असलेले परिमल असणारे यांनी अकोला शहरात मतदानाचा हक्क बजावला आहे .
दहिगाव अवताडे येथे मतदान करून आलेले नवरदेव राहुल महादेवराव सोळंके रा.दहिगाव याचे सरपंच रविकिरण काकड, पोलीस पाटील अरविंद अवताडे तलाठी संदीप ढोक यांनी स्वागत केले. (Lok Sabha Election)
अकोला येथील युवा मतदार परिमल असनारे शिक्षणानिमित्त सिंगापूर येथे असतात. मात्र मतदान हा आपला महत्त्वाचा अधिकार असून तो प्रत्येकाने बजावला पाहिजे हा संदेश देत परिमल असनारे यांनी सिंगापूर वरून येत अकोला येथील एल आरटी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी प्रत्येकाने मतदान करावे व लोकशाही मजबूत करावी असा संदेश दिला. (Lok Sabha Election)