आजचे मतदान देशात क्रांती घडवेल : आमदार बच्चू कडू
नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा आजच्या लोकसभा निवडणुकीत मतदानातून देशात एक क्रांती घडेल असा दावा प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. गेल्या वीस वर्षांपासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढत आहोत. मला मतदारांकडून एकच अपेक्षा आहे की, ही लढाई आम्ही शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कष्टकरी यांच्यासाठी लढत आहोत. तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी.
निश्चितच ही निवडणूक शेतकरी, शेतमजूर हे आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आजच्या मतदानामुळे या देशात एक क्रांती घडेल. जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुरांच्या नावावर ही निवडणूक आगळीवेगळी ठरेल असेही बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा :
काश्मीर, कुलू-मनालीसह, नैनीताल, शिमल्याला नाशिककरांची पसंती, पर्यटनाकडे वाढला कल
EVM-VVPAT case मोठी बातमी | EVM-VVPAT पडताळणी संदर्भातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
Lok Sabha Election: राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सकाळी ७.४५ टक्के मतदान