लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा (एएफएमसी) गुरुवारी 58 व्या तुकडीचा पदवीदान समारंभ पार पडला. या वेळी डॉक्टर 112 पैकी 88 महिला, तर 25 पुरुषांना सैन्य दलाच्या विविध शाखेत दाखल करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे महासंचालक ले. जन. दलजीत सिंग उपस्थित होते. नव्याने देशसेवेत नियुक्त झालेल्या अधिकार्‍यांचे अभिनंदन …

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ उत्साहात..!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचा (एएफएमसी) गुरुवारी 58 व्या तुकडीचा पदवीदान समारंभ पार पडला. या वेळी डॉक्टर 112 पैकी 88 महिला, तर 25 पुरुषांना सैन्य दलाच्या विविध शाखेत दाखल करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे महासंचालक ले. जन. दलजीत सिंग उपस्थित होते. नव्याने देशसेवेत नियुक्त झालेल्या अधिकार्‍यांचे अभिनंदन करून त्यांना देश आणि सशस्त्र दलांची समर्पणाने सेवा करण्याचे आवाहन केले. त्यांना उज्ज्वल समृद्ध भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 58 व्या तुकडीत 112 पैकी 25 मुली, तर 88 मुलांचा समावेश आहे. यातील एकूण 88 जण लष्करात, तर 10 नौदलात, तर 14 कॅडेटस ना हवाईदलात प्रवेश देण्यात आला.
सुवर्णपदकाचे मानकरी
कॅडेट्सच्या अतुलनीय शैक्षणिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी कमिशनिंग समारंभानंतर शैक्षणिक पुरस्कार सादरीकरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ आणि ‘कलिंग करंडक’ हे महाविद्यालयाचे दोन प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. यावर्षी ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ फ्लाइंग ऑफिसर आयुष जैस्वाल यांना आणि ‘कलिंग ट्रॉफी’ डॉ. ऐश्वर्या रामकृष्णन अय्यर यांना प्रदान करण्यात आली.
हेही वाचा

Nashik Crime News | यात्रेच्या वर्गणीवरूण चाडेगावला गोळीबार, एकाच्या पाठीत घुसली गोळी 
कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या उद्याच्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त
Solapur Lok Sabha Election 2024 सोलापुरात प्रतिष्ठेची लढत