आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला
चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आज प्रतिकूल परिस्थितीमध्येही तुम्ही तुमचे धैर्य कायम राखाल. आरोग्याच्या समस्येवर खर्च होईल. नकारात्मक विचार टाळा. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेतल्याने अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायात अधिक गांभीर्याने काम करा, अशी सूचना श्रीगणेश देतात. पती-पत्नीचे एकमेकांशी चांगले संबंध राहतील. हंगामी आजार त्रासदायक ठरू शकतात.
वृषभ : भावनेच्या आहारी जावून आज कोणताही निर्णय घेवू नका. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीत काही बदल जाणवतील. याचा कुटुंबावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. चुकीच्या वादात शक्ती वाया घालवू नका. वडीलधाऱ्यांच्या आणि आदरणीय व्यक्तींच्या सहवासात थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. व्यवसायात आज काही सकारात्मक उपक्रम सुरू होऊ शकतात. घरातील छोट्या-मोठ्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्य चांगले राहू शकते.
मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, आज अफवांवर लक्ष देऊ नका. आत्मपरीक्षण करा. धार्मिक कार्यातील सहभाग तुम्हाला शांतता प्रदान करेल. विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतील. सध्या सूरु असलेल्या कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. समस्यांना घाबरण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या महत्त्वाच्या गोष्टींची स्वतः काळजी घ्या. कामाच्या जास्त ताणामुळे पाय दुखण्याची तक्रार असू शकते.
कर्क : श्रीगणेश सांगतात की, ग्रहमान तुम्हाला परिस्थितीशी लढण्याचे बळ देत आहे. लोकांच्या चर्चेत दुर्लक्ष करा. तुमचा निर्णय सर्वोपरि ठेवा. मेहनतीने आणि कर्तृत्वाने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण कराल. सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर घेवू नका. इतर लोकांच्या समस्यांमध्ये अडकून तुम्ही वैयक्तिक कामावर प्रभाव टाकू शकता. आरोग्य चांगले राहील.
सिंह : काही काळापासून सुरू असलेली कोणतीही समस्या आज दूर होण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक कार्यातील सहभागामुळे दैनंदिन कामांतून आराम मिळू शकतो. काही वेळा विनाकारण छोटय़ा छोटय़ा बोलण्याने घरातील वातावरण खराब होऊ शकते. मुलांशी जास्त बोलल्याने त्यांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो. व्यवसायातील बहुतांश कामे सुरळीतपणे पूर्ण करता येतील. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. मधुमेही लोकांनी विशेष काळजी घ्यावी.
कन्या : श्रीगणेश सांगतात की, यावेळी ग्रहांची स्थिती आर्थिक नियोजनाशी संबंधित कामांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची सूचना देत आहे. निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. इतरांवर जास्त विश्वास ठेवणे आणि त्यांच्या चर्चेत येणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. शेजाऱ्याशी वाद टाळा. व्यवसायात कोणतेही नवीन काम यशस्वी होणार नाही. कुटुंबात योग्य सुव्यवस्था राखली जाईल. खोकला, ताप, सर्दी यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
तूळ : आर्थिक बाबींशी संबंधित परिस्थिती काहीशी सामान्य असेल, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही रुची वाढेल. काही लाभदायक योजनांबाबत भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकांशी चर्चा होऊ शकते. तणावामुळे कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. जवळच्या नातेवाईकाकडून काही दुःखद बातमी मिळाल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. व्यस्तता सोडून तुम्ही कुटुंबाला प्राधान्य देऊ शकता. वेदना आणि थकवा यामुळे थोडे अस्वस्थ वाटेल.
वृश्चिक : आज घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा. कुटुंबाच्या सुरक्षिततेबाबत तुम्ही केलेले नियमही योग्य असतील. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठांना आरोग्य संबंधित समस्या जाणवेल. व्यावसायिक कामात गाफील राहू नका. जोडीदाराचा भावनिक पाठिंबा तुमच्या क्षमतेला नवी दिशा देईल. आरोग्य चांगले राहील.
धनु : महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्या. कार्यक्षमतेच्या जोरावर कोणतेही चांगले काम पूर्ण करू शकाल. आवडीच्या कार्यात थोडा वेळ घालवा. कोणीतरी तुमच्या भावनिकतेचा आणि उदारतेचा फायदा घेऊ शकेल. तुमच्यातील या दोषांवर नियंत्रण ठेवा. मातृपक्षाच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ देऊ नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. व्यवसायाच्या दृष्टीने वेळ सामान्य राहील. आरोग्य चांगले राहू शकते.
मकर : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहांची स्थिती थोडी चांगली आहे. विद्यार्थी आणि तरुणांना स्पर्धात्मक कार्यात यश मिळण्याची चांगली संधी आहे. महत्वाची कामे दिवसा पूर्ण करा. जास्त चर्चा करण्यात वेळ वाया घालवू नका. आपल्या योजना त्वरित सुरू करण्याचा प्रयत्न करा. खर्च जास्त असू शकतो. एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळाल्याने आर्थिक स्थिती सुधारू शकते. घर आणि कुटुंबातील लोकांसोबत थोडा वेळ घालवणे आणि विचारांची देवाणघेवाण केल्याने सकारात्मकता येईल.
कुंभ : आजचा दिवस थोडा संमिश्र असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल. जवळच्या नातेवाईकासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील आणि परस्पर संबंध सुधारू शकतात. काहीवेळा तुमची अति-शंका इतरांना त्रास देऊ शकते. वेळेनुसार तुमचे विचार बदला. विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतील. कार्यक्षेत्रात कर्मचाऱ्यांशी वादाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आज कुटुंबासोबत धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. मुलांमध्ये सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्याने मनःशांती लाभेल. सर्व प्रकरण शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमची महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. सध्याच्या परिस्थितीमुळे तुम्ही केलेले व्यावसायिक बदल योग्य असतील. कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवला तर बरे होईल. आरोग्य चांगले राहील.
