महाराष्ट्रासह 13 राज्यांतील 88 जागांवर आज मतदान

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांच्या 88 लोकसभा मतदारसंघांत 26 एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदानात केरळच्या वायनाडमधून लढणारे काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानच्या कोटा येथून रिंगणात असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघात भाजपकडून लढणार्‍या चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी, रामाची भूमिका साकारणारे मेरठमधील उमेदवार अभिनेते अरुण …

महाराष्ट्रासह 13 राज्यांतील 88 जागांवर आज मतदान

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्रासह देशातील 12 राज्यांच्या 88 लोकसभा मतदारसंघांत 26 एप्रिल रोजी दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. या मतदानात केरळच्या वायनाडमधून लढणारे काँग्रेस नेते राहुल गांधी, राजस्थानच्या कोटा येथून रिंगणात असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघात भाजपकडून लढणार्‍या चित्रपट अभिनेत्री हेमा मालिनी, रामाची भूमिका साकारणारे मेरठमधील उमेदवार अभिनेते अरुण गोविल यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि इतर अनेक दिग्गज नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. दुसर्‍या टप्प्यात एकूण 1198 उमेदवार रिंगणात असून, त्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघांत  मतदान पार पडणार आहे. देशातील केरळ, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 12 राज्यांतील 80 मतदारसंघांतही मतदान होत आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार 89 मतदारसंघांत मतदान पार पडणार होते. मात्र मध्य प्रदेशातील बैतुल लोकसभा मतदारसंघातील बसपा उमेदवाराचे निधन झाल्यामुळे येथील मतदान लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्या जागेवर आता 7 मे रोजी मतदान होणार आहे.
दुसर्‍या टप्प्यात 26 एप्रिल रोजी होणार्‍या मतदानात एकूण 1198 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये 1 हजार 97 पुरुष आणि 100 महिला उमेदवारांचा समावेश आहे. एक तृतीयपंथी उमेदवारही रिंगणात आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दुसर्‍या टप्प्यातील मतदानात 89 जागांपैकी भाजपने 50 जागा जिंकल्या होत्या. एनडीएमधील घटक पक्षांनी 8 तर काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. इतर पक्षांना 9 जागा मिळाल्या होत्या.
कोणत्या राज्यांत किती जागा
केरळ ः 20, कर्नाटक ः 14, राजस्थान ः 13, महाराष्ट्र ः 8, उत्तर प्रदेश ः 8, मध्य प्रदेश ः 6, आसाम ः 5, बिहार ः 5, छत्तीसगड ः 3, पश्चिम बंगाल ः 3 आणि मणिपूर, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर प्रत्येकी एक.
वायनाडमध्ये राहुल गांधींची प्रतिष्ठा पणाला
केरळच्या वायनाड मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी दुसर्‍यांदा रिंगणात उतरले आहेत 2019 मध्ये राहुल गांधी यांनी 4 लाख 31 हजार 770 इतक्या विक्रमी मतांनी विजय मिळविला होता. राहुल गांधी यांच्या विरोधात भाकपच्या अ‍ॅनी राजा निवडणूक लढवत आहेत. भाजपने के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसर्‍या टप्प्यावर एक नजर
राज्ये ः 13 उमेदवार ः 1198