खंडणीखोरच म्हणताहेत लूट थांबवू; बावनकुळेंची ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यावर टीका
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : वसुली करणारे, खंडणीखोरच म्हणत आहेत लूट थांबवू ! या शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.
सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना कवडीही दिली नाही. नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागत आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे. (Chandrashekhar Bawankule)
ज्यांची ओळख खंडणीखोर आणि १०० कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे ते म्हणतात आम्ही लूट थांबवू. शेवटी उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीला भुलणार नाही असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
महुआ मोईत्रांच्या विरोधातील मानहानीचा खटला मागे घेण्याचा जय अनंत देहाडराय यांचा निर्णय
हत्तीच्या हल्यात शेतकरी ठार; भामरागड तालुक्यात दहशत
Lok Sabha Election 2024 : पूर्णा तालुक्यात १४९०२१ मतदार बजावणार मतदानाचा हक्क, निवडणूक विभागाची तयारी पूर्ण