हत्तीच्या हल्यात शेतकरी ठार; भामरागड तालुक्यात दहशत
गडचिरोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : तेलंगणा राज्यात दोन जणांचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्यात परतणाऱ्या हत्तीने आज (दि.25) भामरागड तालुक्यातील कियर येथील शेतकऱ्यास ठार केले. गोंगलू रामा तेलामी (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
दि. ३ एप्रिलला हत्ती मुलचेरा तालुक्यातील प्राणहिता नदी ओलांडून तेलंगणा राज्यात गेला होता. तेथील कुमुरमभीम जिल्ह्यातील बुरेपल्ली येथील दोन शेतकऱ्यांना हत्तीने तुडवून ठार केले. त्यानंतर हा हत्ती ६ एप्रिलला पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात आला.
सिरोंचा वनविभागातील बल्लाळम जंगलात बरेच दिवस मुक्काम ठोकल्यानंतर हत्तीने दि. २३ एप्रिलला अहेरी तालुक्यात प्रवेश करुन चिरेपल्ली येथील एका किराणा दुकान आणि धान्याची नासधूस केली. त्यानंतर हत्तीने भामरागड वनपरिक्षेत्रात आज दुपारी ४ च्या सुमारस कियर येथील शेतकरी गोंगलू तेलामी शेतात काम करताना हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्व : चंद्रशेखर बावनकुळे
400 पार होणार नाही म्हणणाऱ्या पोपटांना खानदेशी जनता मतदानातून उत्तर देईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Priyanka Chopra : प्रियांका चोप्राच्या ‘वुमन ऑफ माय बिलियन’ची तारीख समोर