शेवटच्या दिवशी प्रवेशाचे नियम बदलले, थेट मिडीयाला प्रवेश, कुठेच अडवणूक नाही

जळगाव -जिल्हाधिकारी कार्यालयात शेवटच्या दिवशी (दि. 25) भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज सादर केले. दरम्यान उपमुख्यमंत्री हजेरी लावणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्त होता. असे असतानाही  पत्रकारांना आत सोडण्यात येत होते. भाजपाकडून रक्षा खडसे व स्मिता वाघ यांच्यासह रोहित निकम यांनी नामनिर्देशन पत्र भरले. कलेक्टर ऑफिस कडे येणारे दोघेही रस्ते बंद करण्यात आले आहेत. फक्त उमेदवारांना कलेक्टर ऑफिस …

शेवटच्या दिवशी प्रवेशाचे नियम बदलले, थेट मिडीयाला प्रवेश, कुठेच अडवणूक नाही

जळगाव -जिल्हाधिकारी कार्यालयात शेवटच्या दिवशी (दि. 25) भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज सादर केले. दरम्यान उपमुख्यमंत्री हजेरी लावणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्त होता. असे असतानाही  पत्रकारांना आत सोडण्यात येत होते. भाजपाकडून रक्षा खडसे व स्मिता वाघ यांच्यासह रोहित निकम यांनी नामनिर्देशन पत्र भरले. कलेक्टर ऑफिस कडे येणारे दोघेही रस्ते बंद करण्यात आले आहेत. फक्त उमेदवारांना कलेक्टर ऑफिस कडे येण्या जाण्यासाठी सोडण्यात येत आहे. बाकी इतरत्र सर्व मार्ग बदलण्यात आले आहे. Jalgaon Lok Sabha Election
जळगाव जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी दि. 25 नामनिर्देशन भरण्याची शेवटची तारीख आहे. या दिवशी सकाळी रावेर लोकसभाचे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी एकनाथराव खडसे यांचा आशीर्वाद घेऊन सकाळी गिरीश महाजन, मंगेश चव्हाण, किशोर पाटील, चिमणराव पाटील, अमोल गावडे, ज्ञानेश्वर जळकेकर, महाराज राजू मामा भोळे, नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र दाखल केले.
स्मिता वाघ यांनी सुद्धा सकाळी नामनिर्देशन पत्र दाखल केले. भाजपाने महा विजय रथ तयार केला असून यामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत गेस फाउंडेशन पासून रथ निघणार आहे . त्यानंतर पुन्हा भाजपचे उमेदवार आपले नामनिर्देशन पत्र भरणार आहे.  24 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये उमेदवार त्यांच्या कार्यकर्त्यांना एक एक करून सोडत होते. आज मात्र चित्र उलट होते. जास्तीत जास्त व मोठ्या संख्येने कार्यकर्ते वावरत होते.  सकाळी अकरा वाजेला सुरू होणारी रॅली काही कारणास्तव दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. मुख्यमंत्री 1 वाजेला जळगाव दाखल होतील अशी माहिती मिळाली आहे.
स्वतंत्र चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा असल्याने स्वातंत्र्य चौकात कडून भास्कर मार्केट कडे जाणारे मार्गाकडे संपूर्ण वाहतूक वाढवण्यात आलेली आहे. तर कलेक्टर ऑफिस कडे जाणारे दोन्ही मार्ग येणे जाण्याचे बंद करण्यात आलेले आहेत. संपूर्ण वाहतूक ही भास्कर मार्केटकडे वळविण्यात आलेली आहे. यामुळे भास्कर मार्केट जवळ असलेल्या वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे.
रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची श्रीराम दयाराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्रीराम पाटील यांना दोन जणांनी आपले नामनिर्देशन पत्र भरलेले आहेत. त्यामुळे रावेर लोकसभेमध्ये श्रीराम पाटील या नावाचे तीन उमेदवार असणार आहेत. दोन अपक्ष पक्षाकडून ही निवडणूक लढविणार आहे.