Lok Sabha Election : यूट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये दाखल
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप आज (दि.२५) भाजपमध्ये दाखल झाले. यावेळी भाजपचे नेते ते मनोज तिवारी आणि अनिल बलुनी यांची प्रमुख उपस्थिती होती. यापूर्वी कश्यप यांनी पश्चिम चंपारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.
मनीष कश्यप हे जनतेचे प्रश्न मांडतात. आता भाजप त्याच्यासोबत आहे. मी मनीष यांना सुरुवातीपासून ओळखतो. गरिबांचे विकास आणि कल्याण हाच त्यांचा ध्यास आहे. गरिबांच्या कल्याणासाठीचे ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सामील झाला आहे, असे मनीष तिवारी यांनी सांगितले.
#WATCH | Delhi: YouTuber Manish Kashyap joined the BJP today.
Party MP Manoj Tiwari says, “I think a man like Manish Kashyap who raises public’s issues – BJP is with him. I have known Manish from the beginning. He wants welfare of the poor. He has joined PM Modi for welfare of… pic.twitter.com/vvXGxeQDVe
— ANI (@ANI) April 25, 2024
बिहारमधील विविध सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधणारा यूट्यूबर अशी मनीष कश्यप यांची ओळख आहे. त्यांच्या YouTube चॅनलचे सुमारे ८.७५ दशलक्ष सबक्राब्जर्स आहेत. नुकतीच त्यांनी पश्चिम चंपारण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना विधान परिषदेतची ऑफर दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
तामिळनाडू पोलिसांनी अटक केल्यानंतर नाव चर्चेत
मनीष कश्यप हे यूट्यूबच्या जगातलं एक मोठं नाव आहे. मागच्या वर्षी त्यांनी बिहार आणि तमिळनाडूमधील हिंदी भाषिक लोकांविरुद्ध कथित हिंसाचाराचा व्हिडिओ बनवून प्रसारित केला. या प्रकरणी बिहार पोलिसांनी त्यांना अटक केली. तामिळनाडू पोलिसांनी त्याला त्याच्या केसमध्ये मदुराईला नेले जेथे त्याला अनेक महिने तुरुंगात राहावे लागले. या कारवाईविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; पण दिलासा मिळाला नाही. तुरुंगात असताना कश्यप यांनी तेजस्वी यादव यांच्यावर आपेक्षार्ह टीकाही केली होती. ९ महिन्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेचा आलेख चांगलाच उंचावला आहे.तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मनीष कश्यप त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून बिहार आणि देशाची सेवा करणार असल्याचा मानस व्यक्त केला होता. कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळाले तर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पश्चिम चंपारण मतदारसंघात भाजपला मिळणार पाठबळ
कोणत्याही पक्षाकडून ऑफर न मिळाल्यानंतर, YouTuber मनीष कश्यप 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम चंपारणमधून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होते. संजय जयस्वाल यांना कडवी टक्कर देण्यासाठी त्यांची तयारी सुरु होती. मनीष कश्यप यांनी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी मनधरणी करण्यासाठी भाजपने मनोज तिवारी यांना पाठवले होते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. आता कश्यप भाजपमध्ये सहभागी झाल्याने पक्षाला पश्चिम चंपारण मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला माेठे पाठबळ मिळेल, असेही मानले जात आहे.
हेही वाचा :
PM मोदी, राहुल गांधींविरोधातील तक्रारींची ECने घेतली दखल, २९ एप्रिलपर्यंत मागवले उत्तर
Lok Sabha Elections | प्रचारकाळात गाडी कोणतीही वापरा फक्त खर्चाच्या तक्त्यात बसवा, उमेदवारांच्या वाहनांचे दर निश्चित