Rape Case : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; मेजरसह तिघांवर गुन्हा दाखल
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लष्कर पोलिस ठाण्यात सैन्य दलातील मेजरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेजर परिमलकुमार, आई रेवती चंद्र, नातेवाईक सुरेंद्र (रा. इगल कज रूम, चार प्रन्स ऑफ वेल्स, ओरीव रोड, वानवडी) अशी आरोपींची नावे आहेत. हरियाणातील 30 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. हा प्रकार 3 मार्च ते 7 ऑगस्ट 2023 या कालावधीत अरोरा टॉवर वेस्ट विंग, एम. जी. रोड, कॅम्प परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने विवाहासाठी विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. रेवती यांनी त्याद्वारे फिर्यादी तरुणीशी संपर्क केला.
मुलगा परिमलकुमार हा भारतीय सैन्य दलात मेजर पदावर कार्यरत आहे. त्यानंतर रेवती आणि सुरेंद्र या दोघांनी तरुणीच्या घरी फरिदाबाद हरियाणा येथे जाऊन पाच हजार शंभर रुपयांचा शगून देऊन लग्नाची बोलणी केली. त्यानंतर तरुणी आणि मेजर परिमलकुमार हे दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. तरुणी त्याला लग्न करण्याबाबत वारंवार विचारणा करत होती. सुटी नसल्याचे कारण देत आपण लवकरात लवकर लग्न करू, असे आश्वासन परिमलकुमार तरुणीला देत होता. परिमलकुमार याने विश्वास संपादन करून तरुणीला पुण्यात बोलावून घेतले. घरी नातेवाईक असल्याचे सांगून तो तरुणीला बाहेर हॉटेलवर घेऊन गेला. त्याने तरुणीकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. आपण लवकर लग्न करणार असल्याचे सांगून परिमलकुमार याने तरुणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याप्रकरणी, सैन्य दलातील एका मेजरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने फरिदाबाद हरियाणा येथे तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून झिरोने पुढील तपासासाठी लष्कर
पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
– राजेंद्र मगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे
हेही वाचा
राज्यात 109 लाख टन साखरेचे उत्पादनच; ऊसगाळप हंगाम संपण्याची अपेक्षा
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज दोन तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग पाहा
Ear Tagging for Animal : पशुधनांना आता ईअर टॅगिंग बंधनकारक