मोहम्मद शमी ठरला देवदूत अपघातग्रस्ताला तातडीची मदत
नैनिताल; वृत्तसंस्था : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रस्ते अपघातात देवदूत म्हणून समोर आला. मोहम्मद शमीच्या कारसमोर एका कारला अपघात झाला. नैनितालच्या हिल रोडवर हा अपघात झाला. यानंतर शमीने तत्परता दाखवत त्याचा जीव वाचवला. मोहम्मद शमीने या अपघाताची संपूर्ण माहिती त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने या घटनेशी संबंधित एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये एक कार टेकडीच्या खाली झुडपात कोसळताना दिसत आहे. शमीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले- ‘ही व्यक्ती खूप भाग्यवान आहे. देवाने त्याला दुसरा जन्म दिला आहे. नैनितालच्या टेकडी रस्त्यावर माझ्या कारच्या समोरच त्याची कार टेकडीवरून खाली पडली. आम्ही त्याला सुखरूप बाहेर काढले. (Mohammed Shami)
शमीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो एका जखमी व्यक्तीची काळजी घेताना दिसत आहे. इतर लोकही मोठ्या संख्येने तिथे दिसतात. ज्याने शमीला त्या माणसाचा जीव वाचवण्यात मदत केली. स्टार गोलंदाज बराच वेळ त्या व्यक्तीची काळजी घेताना दिसला. आम्ही त्यांचे प्राण वाचवले, असे ते म्हणाले. नैनितालहून परतत असताना त्यांच्यासमोर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो नैनिताल येथे आला होता. रिपोर्टस्नुसार शमीची भाची येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकते. शमी तिथे पोहोचल्यावर त्याचे जोरदार स्वागत झाले आणि अनेक मुलांनी त्याच्यासोबत फोटो काढले. (Mohammed Shami)
View this post on Instagram
A post shared by 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@mdshami.11)
हेही वाचा :
Darren Bravo : डॅरेन ब्राव्होचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय
Hardik Pandya in Mumbai Indians : अखेर ठरलं… हार्दिक पंड्याची घरवापसी!
IFFI Goa 2023 : नाते संबंधांवर चित्रपट बनवायला आवडतो : नुरी बिलग सेयलान
The post मोहम्मद शमी ठरला देवदूत अपघातग्रस्ताला तातडीची मदत appeared first on पुढारी.
नैनिताल; वृत्तसंस्था : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी रस्ते अपघातात देवदूत म्हणून समोर आला. मोहम्मद शमीच्या कारसमोर एका कारला अपघात झाला. नैनितालच्या हिल रोडवर हा अपघात झाला. यानंतर शमीने तत्परता दाखवत त्याचा जीव वाचवला. मोहम्मद शमीने या अपघाताची संपूर्ण माहिती त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने या घटनेशी संबंधित एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे, …
The post मोहम्मद शमी ठरला देवदूत अपघातग्रस्ताला तातडीची मदत appeared first on पुढारी.