पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज दोन तासांचा ब्लॉक; पर्यायी मार्ग पाहा
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर आज (दि.25) रोजी दुपारी 12 ते 2 या कालावधीत दोन्ही वाहिनीवर गॅन्ट्री बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग पाहा, मगच पुढे ज
1) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन कि.मी. 55.000 वरून वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या जुना पुणे-मुंबई मार्गावरून मार्गस्थ करण्यात आली आहेत
2) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झीट कि.मी. 39.800 येथुन वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टाल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
3) द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहून मुंबईकडे येणारी) हलकी व जड-अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झीट कि.मी. 32.500 येथुन वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टाल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
4) पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 या मार्गावरून पुण्याच्या बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडूंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेन मार्गस्थ करण्यात येतील..
हेही वाचा
साखर कारखान्यांना दिलासा : बी-हेवी मोलँसिसपासून इथेनॉल बनविण्यास केंद्राची मंजुरी
Startup News : राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे आज उद्घाटन
शिवछत्रपती-ताराराणी यांचा आज रथोत्सव