जेईई मेन सेशन २ चा निकाल जाहीर, पहिले दोन टॉपर्स महाराष्ट्रातील

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज गुरुवारी (दि. २५ एप्रिल) जेईई (मेन) सेशन २ चा २०२४ चा निकाल जाहीर केला. जेईई मेन सेशन एप्रिल २०२४ मध्ये बसलेले विद्यार्थी jeemain.nta.nic.in. या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतात. दरम्यान, महाराष्ट्रातील गजरे नीलकृष्ण निर्मलकुमार आणि दक्षेश संजय मिश्रा यांनी अनुक्रमे ऑल इंडिया रँक (AIR) …

जेईई मेन सेशन २ चा निकाल जाहीर, पहिले दोन टॉपर्स महाराष्ट्रातील

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज गुरुवारी (दि. २५ एप्रिल) जेईई (मेन) सेशन २ चा २०२४ चा निकाल जाहीर केला. जेईई मेन सेशन एप्रिल २०२४ मध्ये बसलेले विद्यार्थी jeemain.nta.nic.in. या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतात. दरम्यान, महाराष्ट्रातील गजरे नीलकृष्ण निर्मलकुमार आणि दक्षेश संजय मिश्रा यांनी अनुक्रमे ऑल इंडिया रँक (AIR) १ आणि २ मिळवला. त्यानंतर हरियाणातील आरव भट्ट यांनी रँक ३ (AIR-3) मिळवला. राजस्थानच्या आदित्य कुमारने चौथी रँक तर हुंडेकर विदिथने पाचवी रँक मिळवली आहे.
महाराष्ट्रातील गजरे नीलकृष्ण जेईई मेनमध्ये संपूर्ण भारतात टॉपर ठरला आहे. नीलकृष्णचे वडील शेतकरी आहेत आणि आई गृहिणी आहे. नीलकृष्ण जेईई मेन सेशन १ च्या परीक्षेतही टॉपर होता.
एकूण ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यापैकी तेलंगणातील १५ आणि महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Go to Source