निवडणूक रणधुमाळीत पाटणा हादरले..! जेडीयू नेत्‍याची गोळ्या झाडून हत्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या रणधुमाळीत बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्‍त (जेडीयू) पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजधानी पाटणामध्‍ये पुनपुन भागात हा खळबळजनक प्रकार घडला. आज (दि.२५) पहाटे जेडीयू कार्यकर्त्यांनी पाटणा-पुनपुन रस्ता रोको करत गोंधळ घातला. मारेकर्‍यांना तत्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी केली. पाटणामधील पुनपुन परिसरातील बेलदिया पुलाजवळ जेडीयू …

निवडणूक रणधुमाळीत पाटणा हादरले..! जेडीयू नेत्‍याची गोळ्या झाडून हत्‍या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीच्‍या रणधुमाळीत बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्‍त (जेडीयू) पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजधानी पाटणामध्‍ये पुनपुन भागात हा खळबळजनक प्रकार घडला. आज (दि.२५) पहाटे जेडीयू कार्यकर्त्यांनी पाटणा-पुनपुन रस्ता रोको करत गोंधळ घातला. मारेकर्‍यांना तत्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी केली.
पाटणामधील पुनपुन परिसरातील बेलदिया पुलाजवळ जेडीयू नेते सौरभ कुमार यांची हल्‍लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. गोळीबारात त्याचा एक मित्र मुनमुन कुमार जखमी झाला आहे. त्‍याची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेची माहिती मिळताच गावातील लोक रस्त्यावर आले. पाटणा पुनपुन रस्ता रोको करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. पोलीस अधीक्षक कन्हैया सिंग यांनी सांगितले की, पोलिसांच्या पथकाने स्निफर डॉगसह फॉरेन्सिक सायन्स टीमला घटनास्थळी पाचारण केले आहे.
जेडीयू नेते सौरभ कुमार बुधवारी रात्री उशिरा बधैयान कोल गावात त्यांचा मित्र अजित कुमार यांच्या भावाच्या रिसेप्शन पार्टीला गेले होते. रात्री उशीरा ते मित्र मुनमुन कुमार यांच्‍यासोबत रिसेप्शन पार्टीतून शिव नगर येथील आपल्या घरी परत जाण्‍यासाठी निघाले. यावेळी सौरभ कुमार आपल्या कारमध्ये बसले सताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्‍लेखोरांनी त्‍यांच्‍यावर अनेक गोळ्या झाडल्या. सौरभ कुमारच्या डोक्यात आणि त्याचा मित्र मुनमुन कुमारच्या पोटात आणि हाताला गोळ्या लागल्या . गोळीबारानंतर हल्‍लेखोर घटनास्‍थळावरुन पळून गेले. परिसरातील नागरिकांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच सौरभ कुमार यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डॉक्टरांनी घोषित केले. जखमी मुनमुन कुमार यांना पाटणा येथील कंकरबाग येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

#WATCH | Patna, Bihar: On JDU leader Saurabh Kumar shot dead, SDPO Masaurhi Kanhaiya Singh says, “…Saurabh Kumar came with his friends to attend a reception function. While returning he was shot by unknown miscreants, then he was taken to hospital and one other person named… pic.twitter.com/DhWHCYlJay
— ANI (@ANI) April 25, 2024

#WATCH | Patna, Bihar: On JDU leader Saurabh Kumar shot dead, Bihar Congress President Akhilesh Prasad Singh says, “Murder of any political worker is condemnable. But the government needs to investigate the matter and find out the truth and whoever is the accused should be… pic.twitter.com/QyOVMOrKOg
— ANI (@ANI) April 25, 2024